Dhirendra Krishna Shastri controversy Saam
महाराष्ट्र

Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराज थकले अन् समर्थांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Dhirendra Krishna Shastri controversy : छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा संदर्भ देऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर महाराज) यांनी नागपूर येथे केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Dhirendra Krishna Shastri Shivaji Maharaj statement controversy : आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर महाराज) यांनी नागपुरातील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यावर भाष्य केले. "शिवाजी महाराज युद्धाने थकले होते आणि त्यांनी आपले राज्य समर्थांच्या चरणी अर्पण केले," असे विधान बागेश्वर महाराज यांनी केले. यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. (Dhirendra Shastri latest news)

जगातील पहिले भारतदुर्गा मंदिर नागपूरच्या जामठा परिसरात उभारले जाणार आहे. त्याचा भव्य शिलान्यास सोहळा नागपूरमध्ये पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात गुरुशरणानंद महाराज, स्वामी अवदेशानंद, गोविंद गिरी महाराज, साध्वी ऋतुंबरा देवी आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते शिलान्यास झाला.

नेमका वाद काय?

बागेश्वर महाराजांनी आपल्या भाषणात दावा केला की, "छत्रपती शिवाजी महाराज समर्थांकडे गेले आणि म्हणाले की आपण खूप युद्धे लढलो, आता हे राज्य तुम्हीच सांभाळा. काही दिवस मला काहीच करायची इच्छा नाही. त्यावर समर्थांनी राज्य चालवण्याचे मान्य केले, पण ते राजांच्याच आदेशानुसार असेल असे सांगितले."

'चार मुलांचा' सल्लाही वादाच्या भोऱ्यात

केवळ ऐतिहासिक संदर्भच नव्हे, तर महाराजांनी उपस्थित हिंदूंना दिलेला सल्लाही वादग्रस्त ठरत आहे. "हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (RSS) समर्पित करावे," असे विधान त्यांनी केले. लोकसंख्या नियंत्रणावरून देशात राजकीय खडाजंगी सुरू असताना, एका धार्मिक व्यासपीठावरून असे आवाहन करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; 'त्या' समाजाचे जोरदार आंदोलन, नेमके प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरच्या रांगा

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

SCROLL FOR NEXT