Dharashiv Crime Saam Tv
महाराष्ट्र

Shocking: ३ मुलांना घेऊन आई नळदुर्ग किल्ल्यावर गेली, नंतर जे काही केलं ते पाहून सगळे हादरले

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये आईने तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले.

Priya More
  • ३ मुलांना घेऊन आईने नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारली

  • या घटनेत आई आणि मुलाचा मृत्यू तर दोन मुली जखमी

  • दोन मुलींची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू

  • या घटनेचा तपास नळदुर्ग पोलिस करत आहेत

बालाजी सुरवसे, धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या ३ मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारली. या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आई आणि मुलाचा मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धाराशिव हादरले. नळदुर्ग पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले. दोन मुली आणि एक मुलासह आईने नळदुर्ग किल्ल्यावरून उडी घेतली. यात महिलेचा आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

आई आणि मुलगा या दोघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. महिलेने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलिस करत आहेत. संबंधित आत्महत्या करणारी महिला ही उमरगा तालुक्यातील वंताळा गावची असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेने धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. कुटुंबीयांचा जबाब नोंदवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींंच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला! ₹1,500 की ₹3,000 मिळणार? वाचा...

Maharashtra News Live Update : ढोल ताश्यांच्या गजरात करीरोडचा कैवारी गणपती विसर्जन मिरवणूक

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT