denture allegedly found in ration rice in Dharashiv Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Dharashiv Ration Rice Incident : धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळी येथे रेशनच्या तांदळात ६ ते ७ दातांची कवळी सापडल्याचा दावा करण्यात आलाय. या कथित प्रकारामुळे रेशन धान्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Bharat Jadhav

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आलीय. लोहारा तालुक्यातील जेवळी येथे स्वस्त धान्य दुकानातून आणलेल्या तांदळात चक्क दातांचा कवळी सापडल्याचा खळबळजनक दावा करण्यात येतोय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रेशनच्या धान्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेवळी येथील भागाबाई बाबुराव बिराजदार या महिलेने शुक्रवारी 'गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडार' या संस्थेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य आणले होते. सायंकाळच्या वेळी त्यांच्या सुनेने भात शिजवण्यासाठी पिशवीतील तांदूळ निवडीसाठी चाळणीत घेतले. त्यावेळी तांदळात चक्क 6 ते 7 दातांची कवळी आढळली. हे पाहताच बिराजदार कुटुंबाला मोठा धक्का बसला. तांदळात सापडलेले हे दात काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत आहेत. प्राथमिकदृष्ट्या हे दात मानवी आहेत की प्राण्याचे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु अन्न शिजवण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच जेवळी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गरिबांना वाटप करण्यात येणाऱ्या रेशनच्या धान्यात अशी गंभीर निष्काळजीपणा कसा काय होऊ शकतो, असा सवाल नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित रेशन दुकान आणि पुरवठादारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT