Dharashiv Mahayuti  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदेसेना-भाजप आमदारांमधील संघर्ष शिगेला, ११७ कोटींच्या रस्ते कामाच्या आदेशाला स्थगिती

Dharashiv Political News: धाराशिवमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदेसेना आणि भाजप आमदार यांच्यामधील संघर्ष शिगेला गेला आहे. ११७ कोटींच्या रस्ते कामाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

Priya More

Summary:

  • धाराशिवमध्ये महायुतीमधील वाद चव्हाट्यावर

  • सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचे चित्र समोर

  • प्रताप सरनाईक आणि राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष

  • ११७ कोटीच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती

बालाजी सुरवसे, धाराशिव

धाराशिवमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आमदारांमधील संघर्ष शिगेला पोहचला असून सध्या जिल्ह्यात याचीच चर्चा सुरू आहे. धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. धाराशिव शहरामधील तब्बल ११७ कोटीच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला नगरविकास विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीमुळेच स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये महायुतीतला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरामधील ११७ कोटींच्या रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ होणार होता. पण आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून धाराशिव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना स्थगितीचे पत्र देण्यात आले आहे. नगरविकास विभागाकडून धाराशिव नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना स्थगितीच पत्र, तक्रारीचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीमुळे स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ११७ कोटींच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाल्याचे श्रेय घेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र दोनच दिवसांत ११७ कोटींच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्यात आली. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरूनही स्थगिती नाट्य घडलं होतं.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा महायुतीत संघर्षाचा नवा अंक सुरू आहे. सत्ताधारी आमदारांमध्येच वाद सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच पेटलं आहे. धाराशिव शहरातील रस्ते कामाला निधी मंजूर झाल्यानंतर राणाजगजितसिंह पाटील समर्थकाकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. 'धन्यवाद देवा भाऊ, धन्यवाद राणादादा' म्हणत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. पण दोनच दिवसांत कार्यारंभ आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडिलांच्या निधनानंतर आयुष्य बदललं! ना कॉलेज, ना कोचिंगशिवाय क्रॅक केल्या १२ सरकारी परीक्षा; IPS संदीप चौधरी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

जिमवरून आल्यानंतर काय आणि कधी खाल्लं पाहिजे?

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? ठाकरेसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, VIDEO

Trikadasha Yog: आज 18 वर्षांनंतर बुध-यम बनवणार त्रिएकादश योग; करियरमध्ये होणार चांगली प्रगती, पैसाही मिळणार

SCROLL FOR NEXT