Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश

Maharashtra CM Devendra Fadnavis: आगामी पालिका निवडणुकीपूर्वी साताऱ्यात भाजपची ताकद वाढली आहे. साताऱ्यातील माजी नगराध्यक्षांसह ४ माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
Maharashtra CM Devendra Fadnavissaamtv
Published On

Summary -

  • साताऱ्यात भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ मोहिमेला यश

  • कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • ४ माजी नगरसेवकांचाही भाजपमध्ये प्रवेश

  • साताऱ्यात भाजपची ताकद वाढली

साताऱ्यामध्ये भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश मिळाले आहे. भाजपने अनेक बड्या नेत्यांना आणि माजी नगरसेवकांना फोडले असून या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी साताऱ्यामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये या सर्वांनी भाजपचे कमळ हातामध्ये घेतलं.

Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: 'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो...', गोपीचंद पडळकरांचा सांगलीच्या खासदाराला इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांनी भाजपामध्ये एन्ट्री केली. जनशक्ती आघाडीच्या चार माजी नगरसेवकांनी देखील शारदा जाधव यांच्यासोबत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये आज हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग; 4 माजी आमदार गळाला

माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांच्या प्रवेशामुळे कराडच्या राजकारणाची समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाची नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बेरीज असल्याचे देखील म्हटले जात आहे. सातारा नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. साताऱ्यात भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. अशातच या पक्षप्रवेशामुळे भाजपचं बळ आणखी वाढलं आहे.

Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढणार, हिना गावित यांची आज घरवापसी

दरम्यान, नंदुरबारमध्ये देखील भाजपची ताकद वाढली आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हिना गावित यांच्या घरवापसीमुळे भाजपला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उपस्थितीत हिना गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे देखील भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.

Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का बसणार? महत्त्वाच्या बैठकीला ३ आमदारांची दांडी, पक्षात जोरदार चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com