Maharashtra Politics: 'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो...', गोपीचंद पडळकरांचा सांगलीच्या खासदाराला इशारा

Gopichand Padalkar On Vishal Patil: भाजप नेते गोपीचंद पळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. जातीवादाचा किडा असेल, तर ठेचावा लागेल, असे विधान करत त्यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधला.
Maharashtra Politics: 'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो...', गोपीचंद पडळकरांचा सांगलीच्या खासदाराला इशारा
Gopichand PadalkarSaam Tv
Published On

Summary -

  • भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली

  • सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना त्यांनी इशारा दिला

  • जातीवादाचा किडा असेल, तर ठेचावा लागेल, असे खळबळजनक विधान पडळकरांनी केले

  • या वक्तव्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

सांगलीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जंयत पाटील यांच्याकडून मोर्चा वळत त्यांनी आता सांगलीच्या खासदारावर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली. 'विशाल पाटलांमध्ये जातीयवादाचा किडा आहे.', असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता सांगलीतील राजकारण तापले आहे.

Maharashtra Politics: 'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो...', गोपीचंद पडळकरांचा सांगलीच्या खासदाराला इशारा
Gopichand Padalkar: बीडच्या कारागृहामध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरासाठी लाखो रुपयांचे आमिष; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप|VIDEO

'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो ठेचावा लागेल.', असा इशारा गोपीचंद पडळकरांनी खासदार विशाल पाली यांना दिला आहे. विशाल पाटलांकडून फक्त आटपाडी आणि जतमध्येच मीटिंग घेतल्या जातात. जिल्ह्यात इतर कुठेही त्यांच्या मिटींग होत नाहीत. कारण गोपीचंद पडळकर आटपाडी आणि जतमध्ये आहे.', असं सांगत गोपीचंद पडळकरांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते सांगलीच्या विभुतवाडी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते.

Maharashtra Politics: 'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो...', गोपीचंद पडळकरांचा सांगलीच्या खासदाराला इशारा
Gopichand Padalkar : अहिल्यानगर शहराचं नामांतरण ज्यांना मान्य नाही, त्यांच्यावर कारवाई करा; पडळकरांची मागणी

तर दुसरीकडे, जयंत पाटील यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माझ्याशी बोलायचं नाही, असं सांगितलंय. पण 'सिंह एकटा असतो कळपात येत नाही.',असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे. एका कार्यक्रमादरम्यान जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम एकत्र असताना आपल्याशी विशेष कदम आणि विशाल पाटील या दोघांनी संवाद साधल्यानंतर जयंत पाटलांनी त्याच्याशी कशाला बोलता., असं सांगितलं होतं. हा किस्सा सांगत पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली. ते सांगलीच्या आटपाडी येथील विभूतवाडीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

Maharashtra Politics: 'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो...', गोपीचंद पडळकरांचा सांगलीच्या खासदाराला इशारा
Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com