राजारामबापू साखर कारखान्याचं नाव मध्यरात्री बदललं; गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटला

Rajarambapu Sugar Factory Renamed As Raje Vijay Singh Dafle: सांगली जिल्ह्यात पुन्हा राजकीय संघर्ष पेटला आहे. जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे नाव मध्यरात्री अज्ञातांकडून बदलून ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असे करण्यात आले.
Midnight controversy at Jat’s Rajarambapu Patil Sugar Factory — the name board replaced with Raje Vijay Singh Dafle Sugar Factory sparks fresh political fire between Gopichand Padalkar and Jayant Patil.
Midnight controversy at Jat’s Rajarambapu Patil Sugar Factory — the name board replaced with Raje Vijay Singh Dafle Sugar Factory sparks fresh political fire between Gopichand Padalkar and Jayant Patil.Saam Tv
Published On

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तथा माजी मंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील जत येथील साखर कारखान्याचे नाव अज्ञातांकडुन बदलण्यात आले आहे. राजारामबापु पाटील साखर कारखाना असे नाव असणाऱ्या स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे करण्यात आले आहे. महापुरुषांचे चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे धुराडा पेटू देणार नाही,असा इशारा दिला होता.यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याकडून 2012 मध्ये विजयसिंह डफळे साखर कारखाना विकत घेण्यात आला होता.

Midnight controversy at Jat’s Rajarambapu Patil Sugar Factory — the name board replaced with Raje Vijay Singh Dafle Sugar Factory sparks fresh political fire between Gopichand Padalkar and Jayant Patil.
Shocking News : पाठलाग करत कार अडवली, खेचत बाहेर ओढलं; नंतर शिवीगाळ करत बेदम मारलं; उद्योजकावर जीवघेणा हल्ला

कारखाना जयंत पाटील यांच्याकडून हडप करण्यात आल्याचा आरोप करत सभासदांच्या मालकीचा असणारा पूर्वीचा विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना परत करावा,अशी मागणी पडळकरांकडून करण्यात आली होती. आणि आता थेट कारखाना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नाव अज्ञातंकडून बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जतच्या साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरु असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Midnight controversy at Jat’s Rajarambapu Patil Sugar Factory — the name board replaced with Raje Vijay Singh Dafle Sugar Factory sparks fresh political fire between Gopichand Padalkar and Jayant Patil.
Maharashtra Politics: 'सर्वांवर आमची करडी नजर, बंडखोरी केली तर...', चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

जत विधानसभा मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर हे आमदार झाल्यानंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गंभीर इशारा पडळकर यांनी काही दिवसापूर्वी दिला होता. जतचा साखर कारखाना हा संभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू वेळपडली तर कायदेशीर लढाई लढणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.

राजे विजय सिंह डफळे नेमके कोण?

राजे विजयसिंह डफळे हे जतचे शेवटचे राजे होते. त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना झाली आहे. यामध्ये या कारखान्याचाही समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com