Dharashiv News  saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : धाराशिव पालिकेत २७ कोटी ३८ लाखांचा अपहार, तत्कालीन मुख्याधिका-यांसह तिघांवर गुन्हा दाखल

या गुन्ह्याचा तपास धाराशिव पाेलिस करीत आहेत.

Siddharth Latkar

बालाजी सुरवसे

Dharashiv News : धाराशिव येथील पालिकेच्या विविध योजनेत 27 कोटी 38 लाख 78 हजार 100 रुपयांचा अपहर केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धाराशिव पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यासह अन्य दाेघांचा समावेश आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Breaking Marathi News)

धाराशिव नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे, तत्कालीन अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पवार यांनी 6 जुलै ते 21 नोव्हेंबर दरम्यान नगरपरिषद धाराशिव येथे एकूण 1088 प्रमाणे शासकीय अभिलेख आहे हे माहित असताना व ते लेखा विभागात जतन करून ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाही.

याबराेबरच विविध विकास योजना व इतर अनुषंगिक खर्चाबाबतचे एकूण 514 प्रमाणे एकूण 27 कोटी 38 लाख 78 हजार 100 रुपयांचा अपहार केला.

तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणाचे जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवले नाहीत याप्रकरणी पालिकेचे लेखापाल अशोक कलेश्वर फरताडे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Roasted Chickpeas : भाजलेले चणे खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

Delhi Ganesh: अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन, वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon Crime : विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीचा घरात घुसून पत्नीवर प्राणघातक हल्ला

STD, ISD आणि PCO चा फुलफॉर्म काय? या तिघांमधील फरक तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या एका एका क्लिकवर

Maharashtra Election : भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार? किंगमेकरसाठी शिंदे-दादांमध्ये स्पर्धा?

SCROLL FOR NEXT