tuljabhavani mandir saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोडबाबतचा निर्णय काही तासांत मागे, तहसीलदारांकडून जाहीर प्रगटण

Tuljabhavani Temple: भारतीय संस्कृतीचा हवाला देत मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला होता.

साम टिव्ही ब्युरो

कैलास चौधरी

Tuljapur News: तुळजाभवानी मंदिरामध्ये विशिष्ट प्रकारचे कपडे घालून येणाऱ्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. मात्र अल्पवधीतच मंदिर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे.

मंदिरामध्ये वेस्टर्न कपडे (Western Cloths) घालणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला होता. मंदिर परिसरामध्ये याबातचे फलक देखील लावण्यात आले होते.

मात्र आता तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

तुळजाभवानी मंदिर परिसरात 'अंग प्रदर्शन, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्यात आले होते. या फलकावर 'कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भाव ठेवा, अशा प्रकारची विनंतीही करण्यात आली होती.  (Breaking Marathi News)

मात्र अवघ्या काही तासात हा निर्णय बदलण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीचा हवाला देत मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला होता. या निर्णयावर पुजारी व भाविकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. तर तृप्ती देसाई यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे मंदिर प्रशासनाने सावध भूमिका घेत आपला निर्णय मागे घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT