tuljabhavani temple
tuljabhavani templesaam tv

Tuljabhavani Temple: भारतीय संस्कृतीचे भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात यापुढे ड्रेसकोड; वेस्टर्न कपडे घालून येणाऱ्यांना बंदी

Latest News: मंदिर परिसरामध्ये याबातचे फलक देखील लावण्यात आले आहेत.
Published on

Tulajapur News: संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरामध्ये (Tuljabhavani Temple) यापुढे ड्रेसकोडशिवाय प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. या मंदिरामध्ये वेस्टर्न कपडे (Western Cloths) घालणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरामध्ये याबातचे फलक देखील लावण्यात आले आहेत.

tuljabhavani temple
Trimbakeshwar Temple News: त्र्यंबकेश्वरच्या वादात आता आखाड्याची उडी, सत्य शोधण्यासाठी समितीची स्थापना

तुळजाभवानी मंदिरामध्ये यापुढे पुजाऱ्यांसह भाविकांना ड्रेसकोड असणार आहे. मंदिरात ड्रेसकोडशिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. मंदिरातील पुजाऱ्यांसह भाविकांना ड्रेसकोड असणार आहे. काही पुजारी मंदिर परिसरात जिन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर मंदिर प्रशासनाने नोटीस काढत मंदिर परिसरात फलके लावली आहे. ड्रेसकोडचे पालन न केल्यास कारवाई केली जाणार आहे.

tuljabhavani temple
Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण; आखाडा परिषद शोधणार परंपरेचे सत्‍य

तुळजाभवानी मंदिर परिसरात 'अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर 'कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भाव ठेवा, अशा प्रकारची देखील विनंती करण्यात आली आहे. त्याचसोबत, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांशिवाय पुजाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थेने अशा सूचनांचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com