Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण; आखाडा परिषद शोधणार परंपरेचे सत्‍य

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणात आखाडा परिषदेची उडी; परंपरेचे शोधणार सत्‍य
Trimbakeshwar News
Trimbakeshwar NewsSaam tv
Published On

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर मंदिरातील बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावरून वातावरण चांगलचं (Nashik News) तापलंय. या प्रकरणावरून एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. तर दुसरीकडे आखाडा परिषदेनेही आता या वादात उडी घेतली असून धूप दाखवण्याच्या परंपरेमागील सत्य आता आखाडा परिषद शोधणार आहे. या सर्व वादात (Trimbakeshwar) त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांनी मात्र या घटनेच्या राजकारण करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत गावातील एक एकोपा कायम राखण्याची स्तुत्य भूमिका घेतली. (Latest Marathi News)

Trimbakeshwar News
Nandurbar News: योग्य भाव मिळत नसल्याने कांदा रेल्वेने जम्मू कश्मीरकडे; खासदार डॉ. गवितांनी काढला तोडगा

त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेश प्रकरण काही शांत होतांना दिसत नाही. या प्रकरणी एकीकडे हिंदू संघटनांनी घेतलेला आक्रमकपणा तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण जोरात सुरू आहे. असे असतांनाच आता त्र्यंबकेश्वरमधील आखाडा परिषदेनेही या वादात उडी घेतली. त्र्यंबकेश्वराला खरोखरच उरुसमधील धूप दाखवण्याची परंपरा आहे की नाही? मंदिरात बळजबरीने घुसण्याचा खरचं प्रयत्न झाला अथवा नाही? यागील सत्य आखाडा परिषद शोधणार आहे. त्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या ७ आखड्यांमधील साधू, महंतांची समिती गठित करण्यात आली असून ही समिती १ जूनला आपला निर्णय देणार आहे.

Trimbakeshwar News
Jalgaon Cyber Crime: पन्नास– शंभर रुपयांच्या लालसेत गमावले तीन लाख; यू-ट्यूब सबस्क्रीप्शनच्या नावे लुटले

ग्रामस्‍थांची शांतता

एकीकडे मंदिर प्रवेशावरून मोठं वादळ निर्माण झाले असताना त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र शांतता आहे. त्र्यंबकवासियांनी शांतता आणि सलोख्याची स्तुत्य भूमिका घेतली. गावातील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिक आणि नेते मंडळींनी बैठक घेऊन या प्रकरणाचे राजकारण करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केलाय. या प्रकरणाचे कुणीही राजकारण करू नये, गावात शांतता राहू द्यावी, अशी विनंती गावकऱ्यांनी केली.

त्र्यंबकेश्वर प्रकरणातील सत्य शोधण्यासाठी राज्यसरकारने देखील एसआयटी नेमलीय. या प्रकरणामागील सत्य आणि तथ्य चौकशीनंतर समोर येईल. मात्र यावरून जातीय तेढ निर्माण न करता जातीय सलोखा आणि एकोपा कायम राहील, यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com