Tulja Bhawani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhawani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा अधिक कडक; भाविकांना पर्स, बॅग नेण्यास बंदी

Dharashiv News : भारत व पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही बाजुंनी हवाई हल्ले केले जात असून पाकिस्तान कडून कुरघोड्या थांबलेल्या नाही. याला भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर दिले जात आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावग्रस्त परिस्थिती पाहता देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी काळजी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये देखील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येथे पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला असून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना आता सोबत पर्स व बॅग नेण्यास बंदी करण्यात आली आहे. 

भारत व पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तीन दिवस झाले दोन्ही बाजुंनी हवाई हल्ले केले जात असून पाकिस्तान कडून कुरघोड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. याला भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यातील प्रमुख शहरांसह प्रमुख धार्मिक स्थळांवर देखील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 

गेटवरच भाविकांची कसून तपासणी 

त्यानुसार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या सुट्यांचा कालावधी असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातच युद्धजन्य परिस्थिती असल्याने येथे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून मंदिरात येणाऱ्या भाविकांची आत प्रवेश करण्यापूर्वीच कसून तपासणी केली जात आहे.

बॅग, पर्स नेण्यास बंदी 

तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांच्या बरोबर असलेल्या बॅग आणि महिला भाविकांच्या जवळ असलेल्या पर्स मंदिरामध्ये नेण्यास बंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात तुळजाभवानी मंदिर संस्थांनी मंदिर परिसरामध्ये अशा सूचनांचे बॅनर देखील मंदिर संस्थानकडून लावण्यात आले आहे. यामुळे भाविकांना आता आपले सामान बाहेरच ठेवून मंदिरात दर्शनासाठी जावे लागणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT