Dharashiv News Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv News: शिक्षक प्रेरणा परिक्षेवर शिक्षकांचा बहिष्कार,बहुतांश परिक्षा केंद्र रिकामे

या परीक्षेवर शिक्षकांनी बहिष्कार घातल्याने जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर एक ते दोन शिक्षक वगळता कोणीही फिरकले नसल्याचा प्रकार समोर आला

Shivani Tichkule

बालाजी सुरवसे

Teacher's Examination: धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेवर शिक्षकांनी बहिष्कार घातल्याने जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर एक ते दोन शिक्षक वगळता कोणीही फिरकले नसल्याचा प्रकार समोर आला.  (Latest Marathi News)

शिक्षकांचे विषय ज्ञान वृद्धिंगत व्हावे, स्पर्धात्मक वातावरणात गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी मिळावी, विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांकरिता (Teachers) या परीक्षेचे आयोजन केले होते.

मात्र या परीक्षेकडे जिल्ह्यातील शिक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान विभागीय आयुक्तांनी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यापूर्वी सर्व संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि परीक्षे विषयी माहिती दिली होती. ही परिक्षा ऐच्छिक होती त्यामुळे कारवाई होणार नसल्याचे सांगितले होते तेव्हा सर्व संघटनांनी संमती दिली होती. मात्र या परीक्षेला जिल्ह्यातील शिक्षकांनी व अनेक संघटनांनी विरोध दर्शवत परीक्षेला हजर न राहील्याने परीक्षा केंद्रे ओस पडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCA ची माहिती

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, दुर्घटनेचा पहिला व्हिडिओ अन् फोटो समोर

Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Ajit Pawar: मोठी बातमी! अजित पवारांच्या विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान बारामतीत दुर्घटना, VIDEO समोर

Skin Care : चेहऱ्यावरील डाग कमी करायचे आहेत? मग वापरा 'हा' मॅजिकल फेसपॅक

SCROLL FOR NEXT