Jaipur-Mumbai Train Firing: जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबाराचा थरार; ४ ते ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती

Jaipur Mumbai Train Firing News: मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येतेय. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची माहिती आहे. दहिसर ते मीरारोड दरम्यान ही घटना घडली आहे.
Mumbai Breaking News Jaipur Mumbai train firing 4 to 5 passengers death
Mumbai Breaking News Jaipur Mumbai train firing 4 to 5 passengers deathSaam TV

Jaipur Mumbai Train Firing News in Marathi:

मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास अंदाधूंद गोळीबार झाला. या गोळीबारात एका आरपीएफ जवानासह ४ ते ५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झालेत. थरकाप उडवणारी ही घटना दहिसर ते मीरारोड (Palghar) स्थानकादरम्यान घडली.

Mumbai Breaking News Jaipur Mumbai train firing 4 to 5 passengers death
Mumbai Local Train News: तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

घटनेची माहिती मिळतात जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्राथामिक माहितीनुसार, जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेन गुजरातमधून महाराष्ट्रात दाखल झाली. ट्रेनने पालघर क्रॉस करताच मीरारोड ते दहिसरदरम्यान सकाळी ५ वाजेच्या सुमारास ट्रेनमध्ये गोळीबार झाला.

प्राथामिक माहितीनुसार, जयपूर-मुंबई धावत्या ट्रेनमध्ये दोन आरपीएफ जवानांमध्ये वाद (Crime News) झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की यातील एका जवानाने आपल्या सहकारी जवानावर अंदाधूंद गोळीबार केला. या घटनेत एका जवानासह ४ ते ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai Breaking News Jaipur Mumbai train firing 4 to 5 passengers death
Maharashtra Monsoon 2023: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात लवकरच पाऊस ब्रेक घेणार; ऑगस्ट महिन्यात काय होणार?

चेतन कुमार या आरपीएफ जवानाने हा गोळीबार केला असल्याचे समजते. घटनेनंतर तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, गोळीबाराची घटना लक्षात येताच लोको पायलटने ट्रेन थांबवली. त्यानंतर तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच, जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलिसांनी घटनास्थळावर दाखल झाले. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी बोरिवली येथील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेतन कुमार याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com