Kalamb Nagar Parishad Saam tv
महाराष्ट्र

Kalamb Nagar Parishad : बड्या थकबाकीदारांची नावे झळकणार डिजिटल बोर्डवर; वसुलीसाठी कळंब नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडवर

Dharashiv News : महापालिका, नगरपालिकेकडून थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. प्रामुख्याने बड्या थकबाकीदारांवर लक्ष राहणार असून मार्च एंडिंग पूर्वी मालमत्ता कराची अधिक वसूल करण्याचे नियोजन आखण्यात आले

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरोधात प्रशासन आता ऍक्शन मोडमध्ये आले आहे. नाके वर्ष कर न भरणाऱ्यांविरोधात हि धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषद प्रशासन देखील ऍक्शन मोडमध्ये आले असून बड्या थकबाकी दारांकडून देखील वसुली केली जाणार असून शहरातील बड्या थकबाकीदारांची नावे आता डिजिटल बोर्डवर लावले जाणार आहेत. 

आर्थिक वर्ष समाप्तीवर आले असून त्या अनुषंगाने महापालिका, नगरपालिकेकडून थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. प्रामुख्याने बड्या थकबाकीदारांवर लक्ष राहणार असून मार्च एंडिंग पूर्वी मालमत्ता कराची अधिक वसूल करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यानुसार कळंब नगरपरिषदेने बड्या थकबाकीदारांची नावे काढली असून ती शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. 

थकबाकीदारांना बजावली नोटीस 

धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आले असुन नगरपरिषदेच्या गाळ्यांचा किराया थकविणाऱ्या बड्या थकबाकीदारांची नावे आता शहरातील मुख्य चौकांमध्ये झळकणार आहे. या थकबाकी दारांची यादी नगरपरिषदेच्या कर विभागाने काढली असुन थकबाकी दाराला थकबाकी भरण्यासाठी पहिली नोटीस बजावण्यात आली आहे. यात थकबाकीची रक्कम तात्काळ भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

सात दिवसांची दिली मुदत 

दरम्यान नगरपरिषदेकडून बड्या थकबाकीदारांना पहिली नोटीस बजावत रक्कम भरण्यास सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे. अर्थात सात दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास शहरातील मुख्य चौकाचौकात डिजिटल बोर्डवर सर्व थकबाकीदारांची नावे झळकणार असुन करवसुलीसाठी नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT