Fraud Case : पैसे डबल करून देण्याचे सांगत दिली पेपरची रद्दी; अंबरनाथमधील प्रकार, तरुणाला ५० हजारांचा गंडा

Ambarnath News : बँकेत भरणा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला अनोळखी इसम भेटला असताना त्याने तुझ्याजवळचे ५० हजार रुपये तू मला दे त्याबदल्यात माझ्या जवळचे एक लाख रुपये देतो असे सांगत फसवणूक केली
Fraud Case
Fraud CaseSaam v
Published On

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये फोटोग्राफरला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा फोटोग्राफर बँकेत पैसे भरण्यासाठी गेला असताना त्याच्याकडून ५० हजार रुपये घेऊन १ लाख रुपये देतो असं सांगत २ जणांनी त्याला चक्क पेपरच्या घड्या हातात दिल्याचे  समोर आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणूक करणाऱ्यांचा दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 

अंबरनाथमधील आयुष जाधव हा तरुण एका राजकीय नेत्याकडे फोटोग्राफर म्हणून काम करतो. दरम्यान ३१ जानेवारीला दुपारी तीनच्या सुमारास तो अंबरनाथ पूर्वेच्या बँक ऑफ बडोदामध्ये ५० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला बँकेत एक अनोळखी इसम भेटला. या अनोळखी इसमाने तुझ्याजवळचे ५० हजार रुपये तू मला दे त्याबदल्यात माझ्या जवळचे एक लाख रुपये देतो; म्हणून सांगितले. 

Fraud Case
Gas Cylinder Blast : अपार्टमेंटमध्ये गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा स्फोट; मोठी दुर्घटना टळली, साहित्यांचे नुकसान

रुमालात गुंडाळून दिले पेपरची गड्डी 

दरम्यान त्यातले ५०  हजार रुपये तू तुझ्या बँक खात्यातून माझ्या बायकोला पाठव, इथे माझं बँक खातं नाही" असं सांगितलं. याचवेळी त्याठिकाणी अन्य एक दुसरा इसम आला असता त्याने "हा माणूस गरीब आहे, चांगला आहे, याची मदत कर" असं सांगत रुमालात पैसे गुंडाळून आयुषला दिले. आयुषने यावर विश्वास ठेवत रुमालात गुंडाळून दिलेली रक्कम न पाहताच ती बँकेत डिपॉझिट करायला निघून गेला.

Fraud Case
Jalgaon Accident : घरी जाण्यासाठी घेतली लिफ्ट अन्‌ मृत्यूने गाठले; जीपच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

बँकेत गेल्यानंतर प्रकार आला उघडकीस 

मात्र काही वेळाने बँकेत जाऊन त्याने रुमाल उघडून पाहिला असता त्याला रुमालात चक्क वर्तमानपत्राच्या घड्या सापडल्या. यानंतर आयुषला ज्या व्यक्तीने पैसे दिले, त्याचा शोध घ्यायला बँकेच्या बाहेर येऊन पाहिलं असता तिथे त्याला ते दोघेजण कुठेही सापडले नाही. या सर्व प्रकारात आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आयुषने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com