Tuljapur Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Tuljapur Vidhan Sabha : बाल्लेकिल्ला टिकवूनही माझ्यावर अन्याय झाला, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली खदखद

Dharashiv News : गेली पाच वर्षांत तुळजापूरचा विकास केवळ कागदावरच झाल्याची टिका चव्हाण यांनी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर केली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे

धाराशिव : कार्यकर्ते व जनतेच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणुक लढवणार असुन गेली ५० वर्षात विरोधकांशी टक्कर घेवुन कॉग्रेसचा बालेकिल्ला टिकवला. तरीही शेवटी माझ्यावर अन्याय झाला असल्याची खंत काँग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली. 

तुळजापूर (Tuljapur) मतदारसंघात कॉग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना कॉग्रेसकडुन उमेदवारी नाकारत धीरज पाटील यांना कॉग्रेसकडुन (Congress) उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मधुकरराव चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना निशाणा साधला आहे. तर गेली पाच वर्षांत तुळजापूरचा विकास केवळ कागदावरच झाल्याची टिका चव्हाण यांनी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर केली. 

माघार नाहीच 

काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने मधुकरराव चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितले, कि कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जरी सांगितल, तरी कुठल्याही परिस्थितीत निवडणूकीतुन माघार नाही; असा इशारा मधुकरराव चव्हाण यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधीमंडळात विरोधी पक्षनेतेपद असणार का? घटनातज्ज्ञांना काय वाटतं? वाचा

IPL 2025 Mega Auction Live: रिषभ पंतवर लागली रेकॉर्डब्रेक बोली! या संघाने लावली २७ कोटींची बोली

IPL 2025 Mega Auction: श्रेयस अय्यरने इतिहास रचला! लागली IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

Sanjay Kelkar News : ठाण्याच्या विकासासाठी लवकरच पुढचं धोरण ठरवणार; संजय केळकरांनी मानले मतदारांचे आभार

Maharashtra News Live Updates: सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा

SCROLL FOR NEXT