Tuljabhavani Mandir Saam TV
महाराष्ट्र

Tulja Bhavani Temple: तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य गाभाऱ्यातील प्रवेशाच्या आजपासून नोंदी; मंदिर संस्थानचा निर्णय

Tuljapur's Tuljabhavani Mandir: मंदिरातील सुरक्षा व इतर काही कारणांमुळे पोलीस प्रशासनाने दिलेल्या पत्रानंतर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणार्‍या प्रत्यकाची आता नोंद घेतली जाणार आहे. मंदिरातील सुरक्षा व इतर काही कारणांमुळे पोलीस प्रशासनाने दिलेल्या पत्रानंतर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याची सुरवात आजपासून करण्यात येत आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhavani Mandir) येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. शिवाय भाविकांकडून येथे मोठ्या प्रमाणात दान देखील केले जात असते. दरम्यान मंदिरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने मंदिर संस्थानला पात्र पाठवून नोंद ठेवण्याचे कळविले आहे. त्यानुसार मंदिर संस्थानने मंदिराच्या गाभाऱ्यात जाणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाभाऱ्यात जाणाऱ्या पुजारी, भाविक व अन्य व्यक्तिंची लेखी नोंद घेतली जाणार आहे. सुरक्षा व इतर कारणाने पोलिसांनी (Police) याबाबत सुचना केल्याने मंदीर संस्थांनने हा निर्णय घेतला आहे.

खजिना उघडताना पोलिसांना कळविणे बंधनकारक 

या निर्णयामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसणार असुन सुसुत्रता येणार आहे. दरम्यान सिंहासन पुजा व अभिषेक पुजा वगळता इतर वेळी मंदीर प्रवेश करणाऱ्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर तुळजाभवानी देवीचा पुरातन व नियमीत दागिने, खजिना उघडताना पोलीसांना कळविणे व त्यांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करणारे व्यक्तींची नोंदवहीमध्ये नोंद घेण्यात येणार आहे. याबाबतचे पञक मंदीर संस्थांनचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी काढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT