Dharashiv News Saam tv
महाराष्ट्र

Dharashiv : बांधकाम साहित्य पुरविण्याच्या नावाने गंडा; सव्वादोन कोटी रुपयात फसवणूक, पुणे-मुंबईच्या तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा

Dharashiv News : साहित्य पुरविण्यासाठी २ कोटी २० लाख रुपयांची रक्कम आरटीजीएस द्वारे घेतले. मात्र बरेच दिवस होऊन देखील साहीत्य पुरवले नाही. शिवाय पैसे देखील परत न देत फसवणूक केली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट पुरवठा करण्याचे सांगून पुणे आणि मुंबईतील तीन व्यापाऱ्यांनी मिळून धाराशिव शहरातील एका कंत्राटदाराची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात सुमारे २ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी तीन व्यापाऱ्यांविरोधात धाराशिवमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

धाराशिवमधील बांधकामाचे काम घेणाऱ्या कंत्राटदार दिलीप सोळुंके यांना बांधकामासाठी साहित्याची आवश्यकता होती. यातच त्यांची ओळख पुणे येथील जन्नु ओस्वाल, मुंबई येथील वेलकम ट्रेकर्सचे मालक विक जाजोट व आळंदी येथील आशा पुरा स्टील ट्रेडर्सचे मांगीलाल पुरोहीत यांच्याशी झाली होती. या तिघांनी धाराशिव मधील दिलीप सोळुंके यांना बांधकामासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचे सांगितले. 

रक्कम घेऊन साहित्य पुरवठा नाही. 

साहित्य पुरविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापोटी त्यांनी २ कोटी २० लाख रुपयांची रक्कम आरटीजीएस द्वारे घेतले. मात्र बरेच दिवस होऊन देखील साहीत्य पुरवले नाही. शिवाय सोळुंके यांनी पैशांची मागणी केली असता पैसे देखील परत न देत फसवणूक केली. ही घटना ५ मार्च ते १९ मार्च २०२४ या दरम्यान धाराशिव येथे घडली आहे. वर्षभरानंतर देखील साहित्य पुरवठा झाला नाही किंवा घेतलेले पैसे देखील परत घेतले नाही. 

तिघांविरोधात गुन्हा दाखल 
दरम्यान वर्षभराचा कालावधी होऊन देखील दिलेली रक्कम परत देत नसल्याने सोळुंके यांनी या प्रकरणी धाराशिव मधील आनंदनगर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पुणे- मुंबईच्या तीन व्यापाऱ्यांवर धाराशिवमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जात पात पाहून मी कधी राजकारण केलं नाही - धनंजय मुंडे

Dry Lips Care: तुमचेही ओठ खूपच कोरडे होतायेत? या सोप्या टिप्स करा फॉलो

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेटच्या नियमांत बदल; सर्व कामे होणार ऑनलाइन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT