Tuljabhavani Devi Temple Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Devi Temple: तुळजाभवानी मंदीरातील दानपेटीत ३३ किलो अशुद्ध सोने

साम टिव्ही ब्युरो

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani mandir) दर्शनासाठी देशभरातुन भाविक येत असतात. यावेळी ते (Gold) सोने चांदीचे दागिने अर्पण करतात. या अर्पण केलेल्‍या दागिन्‍यांमध्‍ये मागील चौदा वर्षात ८१ किलो पैकी ३३ किलो सोने अशुद्ध असल्‍याचे आढळून आले आहे. (Tajya Batmya)

तुळजाभवानी देवीच्‍या दर्शनासाठी १९९४ ते २००८ या कालावधीत भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंची मोजदाद प्रकिया राबविण्यात आली. दरम्यान त्या चौदा वर्षाच्या काळात ८१ किलो ६४ ग्रॅम ९१० मिलिग्रॅम सोने अर्पण करण्यात आले होते. याचे मुंबई येथील टाकसाळमध्ये शुध्दीकरण करण्यात आले होते. यामध्ये ४७ किलो ८८४ ग्रॅम ३९१ मिलीग्रॅम सोने शुध्द तर ३३ किलो १८० ग्रॅम ५१९ मिलिग्रॅम सोने अशुद्ध असल्याचे समोर आले.

२००८ नंतरच्‍या दागिने शुध्दीकरणसाठी परवानगी

दरम्यान २००८ नंतर देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांची मागील महीनाभरापासुन मोजदाद प्रकिया राबविण्यात आली. यामध्ये २०७ किलो सोने, ३८०० किलो चांदी, ३५४ हिरे रत्नजडित मंगळसुत्र याची मोजणी पुर्ण झाली असुन या मोजदाद झालेल्या दागिन्यांची शुध्दीकरण करण्यासाठी लातुरच्या धर्मादाय आयुक्तांना पञ पाठवण्यात आले आहे. त्याचे पत्र आल्यानंतर शासनाची व आरबीआयची परवानगी घेवुन शुध्दीकरण करण्यात येणार आहे. यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असुन या सोन्याची शुध्दीकरण झाल्यानंतर मंदीर संस्थानच्या नावाने मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे संकेत मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT