Dharashiv Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv: बँकेकडून कर्ज घेत सफरचंदाची बाग फुलवली, पण अवकाळीने होत्याच नव्हतं केलं; धाराशिवच्या शेतकऱ्याचं १५ लाखांचं नुकसान; VIDEO

Dharashiv Farmer Loss 15 Lakh Rupees In Farming: धाराशिवच्या शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या सफरचंदाच्या बॅगेचं नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. एकीकडे उन्हामुळे उकाडा वाढत आहे तर दुसरीकडे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहेत. नुकताच धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सफरचंदाची बाग भुईसपाट झाली आहे.

धाराशिवमध्ये सफरचंद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेला माल अवकाळी पावसामुळे गळून पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. धाराशिवसारख्या दुष्काळी भागात तीन वर्षे मेहनत करुन वाढवलेल्या बागेतील सफरचंद काढणीला आल्यावर पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथील शेतकरी श्रीकांत हरंगेकरांच्या बागेचे नुकसान झाले आहे.ते गेल्या तीन वर्षांपासून या बागेची जोपासना करत होते. बाग जोपासण्यासाठी त्यांनी बँकेचे कर्जदेखील काढले होते. या शेतकऱ्याने आता मदतीसाठी सरकारकडे मागणी केली आहे.

धाराशिव सारख्या दुष्काळी जिल्ह्यात कधी अवकाळी तर कधी गारपीट यामुळे शेतकरी सातत्याने संकटात सापडलेला असतो.अशातच गेली तीन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावातील शेतकरी श्रीकांत हरंगेकर यांच्या एक एकरावर तब्बल १५ लाख रुपये खर्च करुन लावलेली सफरचंदाच्या बाग भुईसपाट झाली आहे.

सफरचंदाची बाग जोपासण्यासाठी वातावरण नसतानाही तीन वर्षे मेहनत करून रोपे जगवली अन् फळ आल्यानंतर अवकाळीने हिरावून नेलं त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेत.सोलापूर येथील एका व्यापाऱ्याला एक दिवस अगोदरच माल देण्यात आला. त्यासाठी त्याच्याकडून काही पैसै देखील घेतले माञ अवकाळीने होत्याच नव्हतं केलय त्यामुळे मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT