Tuljapur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Tuljapur Crime News : तुळजापूरात खळबळ; मुलासारखे सांभाळले त्यानेच केला घात; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली महिलेची हत्या

Dharashiv News : संग्राम पाटील व त्यांची आई एकत्र राहत होते. तर शेजारील ओम निकम नेहमी घरी यायचा. त्याच्या लग्नाची व लग्न ठरल्याची बोलणी करायचा. यामुळे चित्राबाई या देखील ओम याला मुलासारखेच वागायचे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: तुळजापूर येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह सोलापूर ते लातुर बायपास रोडवर नळदुर्ग रोड ब्रिजजवळ सापडला असुन त्यांचा गळा दाबून खुन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या मुलाला पोटच्या मुलासारखं घरात सांभाळ केला. त्याच्यावर विश्वास टाकला. मात्र त्यानेच विश्वासघात करत सोन्याच्या दागिन्यांसाठी खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुलगा संग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

धाराशिवच्या तुळजापूर येथील असलेल्या चित्राताई पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. तर ओम नितीन निकम (वय २१) असे महिलेची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली असुन त्याला पोलिसी खाक्या दाखवताचा त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान संग्राम पाटील व त्यांची आई एकत्र राहत होते. तर त्यांच्या शेजारी ओम निकम हा नेहमी घरी यायचा. त्याच्या लग्नाची व लग्न ठरल्याची बोलणी करायचा. यामुळे चित्राबाई या देखील ओम याला मुलासारखेच वागायचे.  

१८ जुलैपासून होत्या बेपत्ता 

याच दरम्यान १८ जुलैला चित्राताई या घरी नव्हत्या. त्यावेळी त्यांच्या मुलाने घरी आल्यावर पत्नीस विचारले की, आई कुठे आहे. तेव्हा त्या फोन आल्यावर ओम निकम सोबत कुठेतरी गेल्याचे सांगितले. त्या दिवशी रात्री उशीरा ओम निकम याला अनेक फोन केले. मात्र त्याने आईसोबत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. पोलिसांनी तपास केल्यावर चित्रा ताईचा मृतदेह सापडला, मात्र त्यांच्या अंगावर दागिने नव्हते.

ओमने केला विश्वास घात  

चित्राताई यांच्या गळ्यात नेहमी दीड तोळ्याचे गंठण, पाटल्या असे १५ ते १६ तोळे सोने असायचे. त्या नेहमी ते सोने वापरत असत. तर चित्राताई यांनी ओमला स्वतःच्या मुलासारखं सांभाळल. त्याच्या सुख- दुःखात खंबीरपणे आधार दिला. मात्र त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला. त्यांना सोबत नेत गळा दाबून खुन केला. यानंतर अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले. या घटनेने तुळजापूर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; अंधेरी सबवे पाण्याखाली

Pregnancy Care Tips: इम्युनिटी वाढवण्यासाठी गरोदर महिलांनी पावसाळ्यात ‘हे’ खाणं गरजेचं

Gold Rate Today: सोन्याचे दर १०,४०० रुपयांनी वाढले; १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Jalgaon Crime : जळगावमध्ये जोरदार राडा; दोन गटात जुन्या वादातून दगडफेक, परिसरात तणावाचे वातावरण

Pimpri : पिंपरीत वैष्णवी प्रकरणाची पुनरावृत्ती, आणखी एक हुंडाबळी | VIDEO

SCROLL FOR NEXT