महाराष्ट्र

Dhangar Reservation: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर धनगर समाजाचे ठिय्या आंदोलन, तब्बल दीड तास वाहतूक ठप्प

Dhangar Reservation: धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर धनगर समाजाने आज ठिय्या आंदोलन केले.

मंगेश कचरे

Dhangar Reservation

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर धनगर समाजाने आज ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी गेटसमोर आंदोलन करण्यास मज्जाव केल्याने आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको केला. तब्बल दिड तास चाललेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतून ठप्प झाली होती. दरम्यान अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर गेले दहा दिवस चंद्रकांत वाघमोडे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. मात्र या आंदोलनाची दखल कोणत्याही लोकप्रतिनीधीने न घेतल्यामुळे काल आंदोलनाची दिशा बदलण्यात आली आणि राज्यातील आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानुसार आज बारामती येथील सहयोग सोसायटी समोर धनगर समाजाने आंदोलन केले. यावेळी पोलिसांकडून सहयोग सोसायटी आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी काही काळ बारामती भिगवन रस्त्यावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. तर प्रशासकीय भावना समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, पुणे ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट दिली. तर काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भेट दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT