Satara News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा कोरेगाव रस्त्यावर चक्काजाम

Satara News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे
Satara News
Satara NewsSaam tv
Published On

ओंकार कदम
सातारा
 : महाराष्ट्रमध्ये स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. दरम्यान (Satara) सातारा जिल्ह्यात देखील या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. सातारा कोरेगाव रस्त्यावर (Swabhimani Shetkari Sanghatana) स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. (latest Marathi News)

Satara News
Soldier Death : रोटवद येथील जवानाला वीरमरण; दिवाळीच्या सुटीनंतर चर्च दिवसापूर्वी गेले होते कर्तव्यावर

मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये द्यावा आणि यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये आज चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात देखील चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Satara News
Chagan Bhujbal News: नायगावात जाळला छगन भुजबळांचा पुतळा; येवल्यातही काढण्यात आली अंत्ययात्रा

दरम्यान जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी बोलताना (Farmer) मागील हंगामातील ४०० रूपायांचा हिशोब करुन परतावा मिळावा, यासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही; तोपर्यंत आम्ही आंदोलन करत रंगणार आणि हा अंतिम इशारा आहे. जर यावर लवकरात लवकर कार्यवाही झाली नाही तर याचा पेक्षा जास्त तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजू शेळके यांनी कारखानदार आणि प्रशासनाला दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com