Dhananjay Munde  
महाराष्ट्र

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न-नागरी पुरवठा खातं कोणाला मिळालं?

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते रिक्त झाले होते.

Bharat Jadhav

राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या मंत्र्याकडे धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं खातं जाणार याबाबत चर्चा सुरू झालीय. या प्रश्नाचे उत्तर अखेर समोर आले असून सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार स्वत:कडे घेतलाय.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर हा विभाग रिक्त होता. पंरतु अर्थसंकल्पीय अधिवेशनात या खात्याशी संबंधित प्रश्न सभागृहात विचारले जातील. त्यामुळे अजित पवार यांनी तुर्तास या खात्याचा कार्यभार स्वत:कडे घेतलाय. या विभागासंबंधीच्या प्रश्नांना आता ते सभागृहात उत्तर देतील. अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क खात्याचा कारभार आहे. आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्ताने तिसऱ्या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर पडलीय.

मात्र अजित पवार हा अतिरिक्त कार्यभार कधीपर्यंत सांभाळणार आणि हे खाते राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याच्या पदरात टाकणार,याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Lakshmi Puja: आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस! लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ४ राशींसाठी शुभ संकेत

Navi Mumbai : दिवाळीत दु:खाचा डोंगर, कामोठ्यात सिलिंडर स्फोट, भीषण आगीत माय-लेकीचा होरपळून मृत्यू

Mohanthal Recipe : हलवाई स्टाइल परफेक्ट 'मोहनथाळ', आताच नोट करा साहित्य अन् कृती

SCROLL FOR NEXT