Dhananjay Munde targets Manoj Jarange during Beed rally, reigniting OBC–Maratha reservation tensions. saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

Dhananjay Munde vs Manoj Jarange : बीडच्या सभेतून धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंना घेरलंय. मात्र धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध आहे की अस्तित्वासाठी सुरु असलेला संघर्ष? धनंजय मुंडे जरांगे विरोधातून नेमकं काय साधताहेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • बीडच्या सभेत धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंवर टीका केली.

  • जरांगेंवरील टीका ही मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाच्या संघर्षाशी जोडली जातेय.

  • ओबीसी आणि मराठा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता

ऐकलं. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यानंतर ओबीसी आणि मराठा संघर्ष आणखीच तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण मराठा आणि ओबीसीत फूट पाडण्याचं काम एक प्रवृत्ती करतेय, असं म्हणत धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंना लक्ष्य केलंय.

धनंजय मुंडेंची टीका जिव्हारी लागल्यानं मनोज जरांगेंनी तातडीने पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यावेळी जरांगेंनी करुणा मुंडेंचं नाव घेत धनंजय मुंडेंना घेरलंय. बीडमध्ये मराठ्यांना ताकद दाखवावी लागेल, असं म्हणत माझ्या नादी लागू नका, असा इशाराही जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिलाय.

धनंजय मुंडेंच्या टीकेनंतर जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. मात्र या संघर्षाचे चटके बीड जिल्ह्यालाच बसण्याची शक्यता आहे.. त्यामुळे बीड जिल्ह्याला जातीयवादाची प्रयोगशाळा बनण्यापासून वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

SCROLL FOR NEXT