...अन्यथा धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल Saam Tv
महाराष्ट्र

...अन्यथा धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल

टोकाचा इशारा पीडित नर्सने दिला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - स्वतःवर सतत झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या, अत्याचारग्रस्त नर्सला Nurse पोलीसांकडून Police हिन वागणूक देत अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप, बीडमध्ये Beed पीडितेने केला आहे. यामुळे अर्वाच्च भाषा वापरणार्‍या, बीडच्या शिवाजीनगर पोलीस Shivaji Nagar Police ठाण्यामधील दोन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला निलंबित करा आणि मला न्याय द्या.

ही मागणी घेऊन पीडित नर्सने, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमरण उपोषण सुरू केले आहे. जर मला न्याय नाही मिळाला, तर मी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या घरासमोर आत्मदहन करेल. असा संतप्त आणि टोकाचा इशारा पीडित नर्सने दिला आहे.

पीडितेवर लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच वाळू माफिया असणाऱ्या आरोपी तरुणाने सतत अत्याचार केला होता. त्यानंतर त्या तरुणाच्या मामाने त्याचं इतर मुलीसोबत लग्न लावले आणि ते प्रकरण तिथेच मिटवले.

हे देखील पहा -

मात्र त्यानंतरही तो तरुण दारू पिल्यानंतर पीडितेच्या रूमवर येऊन अत्याचार करत असे. याच सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आवाज उठवला. मात्र तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केला.

"सहा वर्ष तुला गोड लागलं" मग आता कशाला आली तक्रार देण्यास असं म्हणत तिला हीन वागणूक देत अर्वाच्च भाषा देखील वापरली. यामुळे पोलीस निरीक्षक ठोंबरे, पीएसआय मीना तुपे आणि कर्मचारी मेखले यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडी हे आमरण उपोषण असचं सुरू ठेवेल. असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिला आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय ? कुठं चिमुकलीवर अत्याचार होतोय.तर कुठं गुंगीचं औषध देऊन बलात्कार. तर कुठं शरीरसुखाची मागणी घेऊन महिलेला मारहाण आणि एवढं होऊनही न्यायाची मागणी घेऊन पोलीस ठाण्यात हीन वागणूक मिळत आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. जे सरकार छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आले, त्या सरकारच्या काळातच अशा दुर्दैवी घटना घडत असतील, तर हे खूप वाईट आहे. याची नैतिक जबाबदारी म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT