Dhananjay Munde Anjali Damania  Saam Tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: मुंडेंचा राजीनामा फिक्स? दमानियांच्या दाव्यामुळे मुंडेंचं टेंन्शन वाढलं? नेमकं प्रकरण काय?

Dhananjay Munde Latest News : धनंजय मुंडेंचं केवळ मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात येण्याची चिन्ह आहेत.

Bharat Mohalkar

धनंजय मुंडेंचं केवळ मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात येण्याची चिन्ह आहेत. अंजली दमानियांनी नेमकं असं काय केलंय? मुंडेंविरोधात उद्या ते आणखी कोँणते बॉम्ब फोडणार आहेत? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. मकोकांतर्गत कारवाई करण्यात आलेला वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणखीनच तीव्र झालीय.

कारण अंजली दमानियांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, ही मुदत संपूनही त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे दमानिया आणखीनच आक्रमक झाल्या आहेत. धनंजय मुंडेंना केवळ मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा दमानियांनी केलाय.

धनंजय मुंडे हे मंत्रिपदी असताना सरकारी कंपनीतून लाभ मिळवत असल्याचा आरोप दमानियांनी केलाय. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीत मुंडे संचालक व्यंकटेश्वर कंपनीची महाजन या सरकारी कंपनीकडून राखेची खरेदी २०२२ मध्ये व्यंकटेश्वर कंपनीतून १२ कोटी २७ लाखांचा नफा मिळवला.

राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक असलेल्या जगमित्र शुगर्समध्ये व्यंकटेश्वरचा पैसा जगमित्र शुगर्सच्या नावाने ८८ एकर ३४ गुंठे जमिनीची खरेदी केलीय. एवढंच नाही दमानिया मुंडेंविरोधात लोकपाल, निवडणूक आयोग आणि कोर्टाचं दार ठोठावणार आहेत. त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आणखी पुरावे देणार असल्याचा बॉम्ब फोडलाय.

दररोज नवनवे खुलासे करुन अंजली दमानियांनी मुंडेंपुढे अडचणींचा डोंगर उभा केलाय. एवढंच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही कोर्टात खेचण्याचा इशाराही दमानियांनी यापुर्वीच दिलाय. त्यामुळे आता स्वतःवरील संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की मुंडेंसाठी कोर्टातही ढाल बनणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT