Dhananjay Munde: धनजंय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया आक्रमक; अजितदादांना 96 तासांचा अल्टिमेटम

Anjali Damania Ultimatum to Ajit Pawar : धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी अंजली दमानिया आक्रमक आहेत. येत्या ९६ तासात अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा असा अल्टीमेटम दमानिया यांनी दिलाय.
Dhananjay Munde
Anjali Damania Ultimatum to Ajit Pawar saam tv
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्तानं आता मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच ९६ तासांचा अल्टिमेटम दिलाय. नेमका काय आहे हा अल्टिमेटम आणि दादांनी तो पाळला नाही तर काय करण्याचा इशारा दमानियांनी दिलाय? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप होत असल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय. त्यातच अंजली दमानियांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमातून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांना 96 तासांचा अल्टिमेटम दिलाय.

Dhananjay Munde
Santosh Deshmukh Case: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईल; धनंजय मुंडे

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंशी व्यावसायिक संबंध असल्याचा दावा करत अंजली दमानियांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत पुरावे देत गंभीर आरोप केलेत.

Dhananjay Munde
Dhananjay Munde: मला देवेद्र फडणवीस म्हणाले, मी मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाही; अंजली दमानिया यांचा दावा

दमानियांचा दादांना 96 तासांचा अल्टिमेटम

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे धनंजय मुंडेंविरोधात सबळ पुरावे दिले

मंत्री धनंजय मुंडेंना महाजनको सरकारी कंपनीकडून नफा मिळत असल्याचा आरोप

कंपन्यांचे बॅलन्सशीट आणि पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर

त्यामुळे 96 तासांत निर्णय न घेतल्यास दादांना कोर्टात घेचणार

Dhananjay Munde
Suresh Dhas: भाजपच्या सुरेश धसांनी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचा काढला भ्रष्टाचार, केले आरोपांवर-आरोप

अंजली दमानियांपाठोपाठ पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही नैतिकतेच्या आधारावर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तर मुंडेंनी राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोर्टात टोलवलाय. मित्र असल्यामुळे अजित पवार मुंडेंना वाचवत आहेत.. मात्र ते योग्य नाही, असं दमानियांनी म्हटलंय.. एवढंच नाही तर अजित पवारांनी मुंडेचा राजीनामा घेतला नाही तर त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दमानियांनी दिलाय... त्यामुळे आता अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की दमानियांना कोर्टात भिडणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com