Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde :...तर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार; संतोष देशमुख प्रकरणावर धनंजय मुंडेंची मोठी प्रतिक्रिया

Dhananjay Munde Latest News : संतोष देशमुख प्रकरणावर धनंजय मुंडेंची मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या उत्तराने मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संतोष देशमुख प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. धनजंय मुंडे हे आरोपीला वाचवताहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या सर्व आरोपांना आता धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्याकडून बोललं जाणार, त्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मंत्री धनंजय मुंडे सध्या नागपुरात आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी धनंजय मुंडे नागपुरात आहेत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणावर भाष्य केलं. धनंजय मुंडे म्हणाले,' विरोधकांनी काहीतरी बोलणार. त्यावर माझ्याकडून बोललं जाणार. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यायला अडचण होणार. जे काही असेल एकदा काय दूध का दूध पाणी का होऊ द्या. मुख्यमंत्र्याच्या उत्तरातून ते कळलं'.

'माझ्या सहकाऱ्याच्या संबंधांना तर जर एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल. त्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस देत असेल, तर परंपरेनुसार मी उपस्थित राहिलो नाही. त्या शिवाय दुसरे कुठेलेही कारण नाही. विरोधकांनी काहीतरी बोलत आहे. ते तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून कळाले असेल. मी सुरुवातीपासून म्हणत आहे, हे घरातलं झालेलं भांडण आहे. त्यातून निर्घृण संतोष देशमुख यांची हत्या अशाप्रकारे झाली आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

'या प्रकरणात तीव्र भावना सगळ्यांची आमची आहे. एस.आय.टी नेमलेली आहे. याचा तपास होणार आहे. कोण होतं काय होतं, घटनेच्या आदल्या दिवशी काय झालं..यामध्ये मकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री फडणवीस जे काही बोलले, तो फक्त या प्रकरणात लावायचा आहे, की यापुढे अशा प्रकरणात लावायचा आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी निवेदन केला आहे, स्वाभाविक सर्वांचा समाधान झालं आहे,असेही ते म्हणाले.

'माझ्या नावावर सदनात जो आरोप करण्यासाठी आहे. शेवटी पोलीस तपासणार आहेत. पोलीस यंत्रणा आहे, की सीआयडीकडे तपास दिला आहे विरोधी पक्षनेत्यानं काय बोलावं मला सांगता येत नाही. वाल्मिक कराड नागपुरात कुठे आहेत, तेही सांगावे. पोलिसांनी त्यांना पकडण्याचे काम केलं असतं. या घटनेमध्ये ज्यांनी कोणी अशा पद्धतीने हत्या केली, त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Face Cream: घरच्या घरी बनवा बीटरूट फेस क्रिम, आठवडाभरात चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Vitamins: वेळीच व्हा सावध! व्हिटॅमिन्सच्या गोळ्या रोज घेणं ठरेल घातक; डॉक्टरांनी सांगितल्या 'या' मर्यादा, आताच घ्या जाणून

MHADA Lottery: खुशखबर! म्हाडाची २००० घरांची लॉटरी! कल्याण-ठाण्यात मिळणार हक्काचे घर; या दिवशी करता येणार अर्ज

Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

SCROLL FOR NEXT