
पुण्यामध्ये सुरू असलेल्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांची नाटक आणी मी या विषयावर प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत बोलताना मनसे अध्यक्षांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये राज्यातील राजकीय वातावरण, जातीपातीचे राजकारण नाट्य कला क्षेत्रावर परखड शब्दात भाष्य केले. यावेळी त्यांनी मोलाचे सल्ले देता देता विविध विषयांवरुन कानउघडणीही केली.
"मराठी कलवांतची मला एक बैठक घ्यायची होती. मात्र आज तो नाट्य संमेलनाच्या माध्यमातुन तो योग आला. मला नाट्य क्षेत्रातील कलाकारांना पहिलं आणि शेवटच सांगायचं आहे. तुम्ही एकमेकांना मान द्या. तुम्ही एकमेकांना त्यांच्या शॉर्ट नावाने हाक मारता. तुम्ही एकमेकांना मान दिलं तर तुम्हाला मान मिळेल," असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
तसेच याच विषयावरील उदाहरण देताना मनसे अध्यक्षांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. समजा आता इथे शरद पवार साहेब आले तर त्यांना मी वाकून नमस्कार करेन. माझ्या महाराष्ट्रातील एक बुजुर्ग नेता आहे. व्यासपीठावर राजकीय काय बोलायचं हा विषय वेगळा आहे, असे ते म्हणाले.
"निवडणुका लढवताना मला अनेकदा लाज वाटते. कारण गेली ७० वर्ष आम्ही तुम्हाला रस्ते देणार, पाणी देणार, वीज देणार हेच मुद्दे मांडतोय. माझा काका ही तेच म्हणायचा मी ही तेच म्हणायचं. अरे तेच ते विषय, मग आपण पुढं कधी जाणार?" असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच "कलाकार मंडळी नसती तर आपल्याकडे अराजकता आली असती. आज लोकं तुमच्यात गुंतून पडले म्हणुन बाकीकडे दुर्लक्ष केलं. अन्यथा आज आपल्यकडे अराजकता पसरली असती. मी तुम्हा कलाकार मंडळींचा खरच आभारी आहे..." असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
"आज जातीपातीचे राजकारण चालले आहे. ते स्वतःहून चालत नाही, ते चालवल जात आहे. महाराष्ट्र एक संग राहू नये याच्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. काही नेते, काही चॅनल ते घडवून आणत आहेत. आणि आपणं बेभाम झाले आहोत.." असे गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केले.
"आपण जे इतिहास वाचत आहात तो सर्व भुगोलावर आधारित आहे. आज राज्याचा भूगोल अडचणीत आहे. पुर्वी महाराष्ट्रातील जमीन युद्ध करून घेता येत होती. मात्र आज तुमची जमीन न कळत विकत घेता येते. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पणपुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही.." अशी चिंताही मनसे अध्यक्षांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अनेक चित्रपटांमध्ये खलनायक दाखवल्याची खंतही व्यक्त केली. "माझ्यावर ही अनेक सिनेमे आले. बहुतांश सिनेमात मला विलन दाखवलं गेले. म्हणून मी ते चित्रपट बंद पाडले नाहीत. शेवटी नाटकात विलनचं लक्षात राहतो..." असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.