Raj Thackeray: 'एकमेकांना मान दिला तर लोकं मान देतील', राज ठाकरेंनी मराठी कलाकारांची केली कानउघडणी

Raj Thakckeray On 100th Marathi Natya Sammelan: राज ठाकरे यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि नाटकातील कालाकार एकमेकांना ज्यापद्धतीने हाक मारतात त्यावरून त्यांना खडेबोल सुनावले. यावेळी त्यांनी 'एकमेकांना मान दिला तर लोकं मान देतील', असा सल्ला या कलावंतांना दिला आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Tv
Published On

100th Marathi Natya Sammelan:

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १०० व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये (100th Marathi Natya Sammelan) हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray MNS Chief) यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी नाटकातील कलाकावंताचे कौतुक केले. नाटक आणि मी याविषयावर बोलताना त्यांनी त्यांचे नाटकाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. त्याचसोबत राज ठाकरे यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि नाटकातील कालाकार एकमेकांना ज्यापद्धतीने हाक मारतात त्यावरून त्यांना खडेबोल सुनावले. यावेळी त्यांनी 'एकमेकांना मान दिला तर लोकं मान देतील', असा सल्ला या कलावंतांना दिला आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, 'मराठी चित्रपट खूप मोठा आहे. पण मराठी चित्रपटाला स्टार नाही. मराठी चित्रपटात कलावंत आहे. तेलुगू, मल्याळम या इंडस्ट्रीत स्टार आहेत. पण आपणच एकमेकांना शॉर्ट फॉर्ममध्ये हाक मारतो. कलाकारांनी एकमेकांना हिनवू नये. दक्षिणेकडील कलाकार एकमेकांना मान देतात. तुम्ही जर तुमचा मान राखला नाही तर तुम्हाला लोकं का मान देतील?', असा सवाल राज ठाकरे यांनी कलाकारांना केला आहे.

Raj Thackeray
Annapoorani Movie: नयनताराच्या 'अन्नपूर्णानी'विरोधात मुंबईत तक्रार दाखल, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

राज ठाकरे यांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांचे कौतुक करत सांगितले की, 'रजनीकांत आणि इलैयराजा हे रात्री एकत्र बसून दारू पित असतील. पण स्टेजवर आल्यानंतर ते एकमेकांना सर बोलून आदराने हाक मारतात. तिकडच्या कलाकारांचे एकमेकांशी संबंध कितीही चांगले असतील. तरी ते एकमेकांना मान देतात. मराठी कलावंतानी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की तुम्ही एकमेकांना मान द्यावा. नाही तर लोकं तुम्हाला मान देणार नाही. कलाकारांनी एकमेकांना मान देणं गरजेचं आहे. तुमचं मोठेपण हे तुम्ही जपले पाहिजे.'

Raj Thackeray
Captain Miller Trailer: 'कॅप्टन मिलर'चा धमाकेदार ट्रेलर आऊट, धनुषच्या खतरनाक लूकने वेधलं लक्ष

'तुम्ही इतरांना मोठे म्हटले पाहिजे, तेव्हा तुम्ही मोठे व्हाल. तुम्ही इतरांना जे काही हाका मारताय त्यामुळे तुमचा आदर कमी होतोय. एकमेकांना मोठे कराल तर तुम्ही मोठे व्हाल. अशोक सराफांना तुम्ही मामा का म्हणता सरळ अशोक सर म्हणाना. इतके मोठे कलाकार आहेत ते. तुमची आपुलकी घरामध्ये ठेवा. लोकांमध्ये आल्यावर तुम्ही एकमेकांना मान देऊनच बोला. तरंच मोठं भवितव्य आहे. आपल्याकडे कुणी येतं खांद्यावर हात टाकतो हे चाललं ते काय आहे? सुधारणा होणे गरजेचे आहे. माझी सर्व कलावतंना हात जोडून नम्र विनंती आहे. ' अशी कळकळीची विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

Raj Thackeray
Javed Akhtar: 'एखादा पुरूष महिलेला बूट चाटायला लावत असेल तर...', 'अ‍ॅनिमल'च्या यशावर संतापले जावेद अख्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com