Javed Akhtar: 'एखादा पुरूष महिलेला बूट चाटायला लावत असेल तर...', 'अ‍ॅनिमल'च्या यशावर संतापले जावेद अख्तर

Animal Movie: या चित्रपटाने चांगली कमाई केली असली तरी या चित्रपटावरुन बरेच वाद झाले आहेत. याचदरम्यान प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी संदीप वंगा रेड्डी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या यशावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Javed Akhtar On Animal Movie
Javed Akhtar On Animal MovieSaam Tv
Published On

Javed Akhtar On Animal Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल (Bobby Deol), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर ‘ॲनिमल’ चित्रपट (Animal Movie) सुपरहिट ठरला. या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसच नाही तर जगभरामध्ये जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिससह जगभरात 886 कोटींपेक्षा जास्त कमाई (Animal Box Office And Worldwide Collection) केली.

या चित्रपटाने चांगली कमाई केली असली तरी या चित्रपटावरुन बरेच वाद झाले आहेत. याचदरम्यान प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी संदीप वंगा रेड्डी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या यशावर प्रश्न उपस्थित केले आहेत. जावेद अख्तर यांनीही ‘ॲनिमल’चे यश धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

पटकथा, लेखक जावेद अख्तर यांनी औरंगाबाद येथील अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटांच्या सध्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचे नाव घेत जावेद अख्तर म्हणाले की, 'माझा विश्वास आहे की आज तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी त्यांना कोणत्या प्रकारची पात्रे तयार करायची आहेत. ज्याचे समाज कौतुक करेल याची चाचणी घेण्याची वेळ आहे. उदाहरणार्थ जर एखादा चित्रपट असेल ज्यामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला त्याचे बूट चाटण्यास सांगितले किंवा जर एखाद्या पुरुषाने स्त्रीला झापड मारणे ठीक आहे असे म्हटले तर आणि जर चित्रपट सुपर डुपर हिट झाला तर ते खूप धोकादायक आहे.'

रणबीर कपूरने 'अ‍ॅनिमल' चित्रपटात तृप्ती डिमरीला आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी बूट चाटण्यास सांगितले होते. त्याचवेळी शाहिद कपूरने 'कबीर सिंह' चित्रपटातील कियारा अडवाणीला झापड मारली होती. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले होते आणि दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. या दोन्ही चित्रपटांच्या यशाबद्दलच जावेद अख्तर यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Javed Akhtar On Animal Movie
Tiger 3 OTT Release: 'टायगर ३' न पाहिलेल्यांसाठी सलमान खानने दिली गुड न्यूज, आता घर बसल्या OTT वर पाहायला मिळणार

जावेद अख्तर यांनी पुढे सांगितले की, 'आजकाल मला असे वाटते की चित्रपट निर्मात्यांपेक्षा प्रेक्षकांची मोठी जबाबदारी आहे. कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायचे आणि कोणत्या प्रकारचे बनू नयेत हे प्रेक्षकांना ठरवावे लागेल. तसेच आपल्या चित्रपटांमध्ये कोणती मूल्ये आणि नैतिकता दाखवली पाहिजे. आपण कोणाला नाकारायचे हे आपल्या हातात आहे. चेंडू सध्या प्रेक्षकांच्या कोर्टात आहे.' जावेद अख्तर यांनी पुढे असेही सांगितले की, 'सिनेमा निर्मात्यांऐवजी सिनेमा पाहणाऱ्या लोकांवर मोठी जबाबदारी आहे. ही तुमची जबाबदारी आहे. कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायचे आणि कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायचे नाहीत हे तुम्ही ठरवा.'

Javed Akhtar On Animal Movie
Nitu Kapoor Ignore Alia Bhatt : 'दोघींमध्ये काही तरी गडबड आहे', नीतू कपूरने सून आलिया भट्टला केलं इग्नोर, VIDEO व्हायरल होताच चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com