Dhananjay Munde Saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: कोरोना बाधित धनंजय मुंडे सध्या काय करतायत?

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे

Dhananjay Munde News:

कोविड पॉझिटीव्ह असल्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे सध्या पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत. घरच्याघरीच राहून ते कोरोनावर उपचार घेत आहेत. क्वारंटाईन असूनही कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले. त्यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 113 व्या बैठकीस ऑनलाईन पध्दतीने उपस्थिती लावली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बैठकीत कृषी परिषदेच्या 112 व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

धनंजय मुंडे हे मागील 5 ते 7 दिवसांपासून कोविड बाधित असून ते पुणे येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत. हळूहळू त्यांच्या प्रक्रृतीत सुधारणा होत असून आजपासून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने कामकाजास सुरुवात केली आहे.

देशभरात कोरोनाच्या JN 1. वेरिएंटचा प्रदुर्भाव वाढताना दिसतोय. अनेक नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात ५० नवीन करोना रुग्णांची नोंद करण्यात आलीये. करोनाचा मृत्यूदर १.८१ टक्के इतका आला आहे. राज्यभरात आज एकूण ३ हजार ६३९ जणांची करोना चाचणी करण्यात आलीये. यात चिंतेची बाब म्हणजे मुंबईत कोरोना बाधित एकूण ९ रुग्ण आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT