Beed Saam Tv News
महाराष्ट्र

Beed News: मारहाण करणं अंगलट! देशमुखांच्या साडूविरोधात गुन्हा दाखल, अटक कधी?

Dhananjay Deshmukhs Relative News: गावातील तरूणाला मारहाण प्रकरणी धनंजय देशमुख यांच्या साडूच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय?

Bhagyashree Kamble

धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर याच्यासह ७ जणांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओंकार सातपुते या तरूणाला मारहाणप्रकरणी दादासाहेब आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. १२ मार्चला समाज माध्यमांमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दादासाहेब खिंडकर काठीनं मारहाण करत होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय.

बीडच्या बाभुळगावचे सरपंच दादासाहेब खिंडकर यांनी गावातीलच ओमकार सातपुते या तरुणाला अमानुष मारहाण केली होती. ही मारहाण गतवर्षी झाल्याचे समोर आलंय. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवरती प्रचंड व्हायरल झाला होता. यात तरूणाला मारहाण करत असलेली व्यक्ती धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकर आहे.

या मारहाण प्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सरपंच दादासाहेब खिंडकर यांच्यासह इतर ७ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुगे यांनी दिली आहे. आरोपींच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची आग अजूनही लोकांमध्ये धगधगत आहे. दरम्यान, धनंजय देशमुख यांच्या साडूचा १२ मार्चला एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर बीडमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. कौटुंबिक वादातून दादासाहेब खिंडकर याने तरूणाचे आधी अपहरण केलं होतं. नंतर शेतात नेत त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT