Dhananjay Deshmukh demands MCOCA action against accused in Santosh Deshmukh murder 
महाराष्ट्र

Santosh Deshmukh : मोबाईल टॉवरवर कुटुंबाचे आंदोलन, आयुष्य संपवण्याचा इशारा, संतोष देशमुख यांचा भाऊ आक्रमक

Beed Masajog news : वाल्मीक कराड याच्यावर मोक्कासह ३०२ ची कारवाई करा, आम्हाला न्याय द्या, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या भावाने केली आहे. धनंजय देशमुख यांनी मागणी मान्य न केल्यास आयुष्य संपवण्याची धमकी सरकारला दिली.

Namdeo Kumbhar

Masajog Sarpanch Santosh Deshmukh case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेने आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. तसेच मकोका अंतर्गत काही आरोपींवर कारवाई केली. मात्र यात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मकोकाची कारवाई केली जावी, तसेच ३०२ च्या गुन्ह्यात आरोपी करावं.. या मागणीसाठी मस्साजोग येथे धनंजय देशमुखसह कुटुंब मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन (Dhananjay Deshmukh to Protest on Tower Demanding Justice in Santosh Deshmukh Murder Case) करणार आहेत. या प्रकरणात आम्हाला न्याय हवा, अशी मागणी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. त्यांनी त्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत आपली भूमिका स्पष्ट केली.

धनंजय देशमुख काय म्हणाले?

गावकऱ्यांची भूमिका काही वेळातच स्पष्ट होईल. पण माझी भूमिका मी आज घेतली आहे. इतक्या दिवस प्रशासन आणि मुख्यमंत्र्‍यांवर विश्वास ठेवलाय. वैभवी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला तपासाची कोणताही माहिती देण्यात आली नाही. खंडणी आणि खून प्रकरणाचा दावा सीआयडीने केला होता. विशिष्ट आरोपी त्यातून बाहेर काढला जातोय का? त्याला मकोका लागत नाही, खुनाच्या आऱोपाखाली येत नाही, मग न्याय कशासासाठी मागायचा. त्यामुळे मी टेलिफोनच्या टॉवरवर आंदोलन करणार आहे. माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

आरोपीला खंडणी ते खूनापर्यंत, सर्वांना ३०२ आणि मकोकामध्ये घेतलेच पाहिजे. नाहीतर मी वरून उडी घेऊन आयुष्य संपवेल. माझ्या कुटुंबियाची हत्या मला पुन्हा पाहायची नाही. माझ्या भावाला त्रास झालेला पुन्हा कुणाला होऊ नये. आम्हाला तपासाची माहिती कोणत्याही प्रकारची दिली जात नाही. काही जणांना मकोका लागला, पण काही जणांना सोडले. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे, असे देशमुख म्हणाले.

तपास यंत्रणेवर दबाव आहे की नाही, मला माहिती नाही. पण मी माझा निर्णय घेतला आहे. न्यायासाठी मी आता आंदोलन कऱणार आहे. मी कोणतेही निवेदन देणार नाही. सर्व पेपर त्यांच्याकडेच आहेत. माझ्या आंदोलनाची माहिती अद्याप दिलेली नाही, तुम्हीच ही माहिती पोहचवा, असे धनंजय देशमुख म्हणाले.

भावाला (संतोष देशमुख) न्याय मिळवून देऊ शकत नसल्याने सोमवारी सकाळी धनंजय यांच्यासहित देशमुख कुटुंबीय मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. मागणी मान्य न झाल्यास टॉवरवरून उडी टाकून जीवन संपवार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT