dhananjay dandale resigns vanchit bahujan aghadi joins congress akola saam tv
महाराष्ट्र

अकोल्यात काँग्रेसकडून वंचितला धक्का, पंचायत समितीच्या सदस्याचा राजीनामा; पक्षातून हकालपट्टी केल्याचा वंचितचा दावा

Akola Latest Marathi News : काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा प्रचाराचा धुळा संभाळत असून लवकरच धनंजय दांदळे हे काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेणार आहेत.

Siddharth Latkar

- अक्षय गवळी

Akola :

ऐन लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) धामधुमीत वंचित बहुजन आघाडीला (vanchit bahujan aghadi) काँग्रेसनं (congress) अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात धक्का दिला आहे. बाळापुर पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्यानं सदस्यापदाचा राजीमाना दिला आहे. धनंजय नारायणराव दांदळे असं या पंचायत समितीच्या सदस्याचे नाव आहे. विशेष म्हणजे आपणचं दांदळेंना पक्षातून निष्कासीत केले आहे, असं वंचितचं म्हणण आहे. दरम्यान धनंजय दांदळे हे आता लवकरच काँग्रेसचे अकोला लोकसभा उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

वैयक्तिक काही कारणांमुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्राथमिक सदसत्व व इतर सर्व पदाचा राजीनामा देत आहे, आजपर्यंत पक्षामध्ये काम करत असताना आपण व सर्व कार्यकर्त्यांनी कुटुंबाप्रमाणे वागणूक दिल्याबद्दल शतशः आभार असं राजीनामापत्र लिहीत धनंजय दांदळे यांनी वंचितला शेवटचा 'जयभिम' ठोकला.

इतकेच नव्हे तर त्यांनी बाळापूर पंचायत समितीचे सदस्य पदाचाही सभापतींकड़ं राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा प्रचाराचा धुळा संभाळत असून लवकरच ते काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पक्षातून हकालपट्टी केल्याचा वंचितचा दावा

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय दांदळे हे पक्षविरोधी काम करत आहेत. वारंवार सुचना देऊन सुध्दा पक्ष विरोधी कारवाई थांबविली नाही. त्यामुळ वंचित बहुजन आघाडी पक्षातून निलंबीत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. अखेर आज 6 एप्रिलपासून पक्षातून निष्कासीत करण्यात येत आहे. त्यामुळ पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षासंदर्भात दांदळे यांच्याशी कुठलाही संपर्क ठेवू नये, असं आवाहन वंचितचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी पत्राद्वारे केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT