Nandurbar Devotees Poisoning Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar Devotees Poisoning : खळबळजनक! बाळुमामाच्या भंडाऱ्यातील पदार्थ खाल्ल्यानंतर १५० हून अधिक भाविकांना विषबाधा

Balumama Devotees : बाळु मामाच्या भंडाऱ्यातील जेवण खाल्ल्यानंतर नागरिकांना त्रास होऊ लागलया. सध्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाविकांनी भगर, आमटी आणि दूध हे पदार्थ खाल्ले.

Ruchika Jadhav

सागर निकवाडे

Balumamancha Bhandara Devotees Poisoning:

नंदुरबारमधून (Nandurbar) मोठी बातमी समोर आली आहे. नंदुरबार तालुक्यातील रणाळे येथे भंडाऱ्यातून १५०अधिक भक्तांना विषबाधा झालीये. बाळु मामाच्या भंडाऱ्यातील जेवण खाल्ल्यानंतर नागरिकांना त्रास होऊ लागलया. सध्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी रणाळे येथे बाळु मामाच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. भंडाऱ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक (Devotees) दाखल झाले होते. आलेल्या भाविकांनी भगर, आमटी आणि दूध हे पदार्थ खाल्ले. हे पदार्थ ज्यांनी ज्यांनी खाल्ले आहेत त्यांना त्रास जाणवत आहे.

मध्य रात्री अडीच ते तीनच्या सुमारास भाविकांना त्रास होण्यास सुरूवात झाली. उल्ट्या, जुलाब आणि मळमळणे असे त्रास अनेकांना होऊ लगाले. 150 हून अधिक जण रणाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात 55 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सर्व रुग्ण धोक्याच्या बाहेर असल्याचं प्रशासनाचं म्हणण आहे.

उपवासाच्या फराळातून ५०० महिला-पुरूषांना विषबाधा

लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल –रूख्मिणीच्या मंदिरात देखील काल अशीच घटना घडली. येथे उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० महिला आणि पुरूषांना विषबाधा झाली. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना पोलीस आणि इतर ग्रामस्थांना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात नेले सर्व रुग्ण आता धोक्याच्या बाहेर आहेत असं प्रशासनाचं म्हणण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT