devendra fadnavis 
महाराष्ट्र

माझे दाैरे सुरुच राहतील! देवेंद्र फडणवीस आज कऱ्हाड, पाटणात

Siddharth Latkar

सातारा : विराेधी पक्ष नेता म्हणून मी माझे दाैरे सुरु ठेवणार असे स्पष्ट मत व्यक्त करणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (बुधवार) सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड आणि पाटण या पूरग्रस्त तसेच दुर्घटनाग्रस्त दौऱ्यावर येत आहेत. यावेळी फडणवीस हे पूरग्रस्त व दुर्घटनाग्रस्त गावांना भेट देणार आहेत. (devendra-fadnavis-visit-karad-patan-flood-landslide-area-sml80)

कोयनानगर येथील स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांना धीर देणार आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली आहे.

श्री. फडणवीस यांचा दाैरा असा

दुपारी पावणेतीन वाजता : आंबेघर- मोरगिरी येथे जाऊन तेथील पूरग्रस्त भागाची पाहणी

दुपारी सव्वातीन वाजता : कोयनानगरकडे जातील. कोयनानगर येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

सायंकाळी पाच वाजता : पाटण तालुक्यातील हुंबरळी येथे जाऊन अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी.

कऱ्हाडला येऊन कृष्णा अभिमत विद्यापीठ ते devendra fadnavis मुक्कामी असतील.

आमदार रोहित पवार आज कऱ्हाडात

कऱ्हाड, पाटण तालुक्यांत निर्माण झालेली पूरस्थिती व भूस्खलन भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार आज (बुधवारी) दौऱ्यावर येत आहेत. पूरग्रस्त व दुर्घटनाग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

Congress Protest: दिल्लीत जनसागर! 'इंडिया' आघाडीचा सुप्रीम कोर्टावर महामोर्चा; पाहा खास फोटो

मालाडमध्ये गरबा महोत्सवासाठी अनोखी अट; गोमूत्र-कुंकवाचा टिळा आणि सनातनी धर्म मान्य असणाऱ्यांनाच प्रवेश

SCROLL FOR NEXT