Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आमच्याजवळही बॉम्ब आहेत, योग्य वेळी फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

"हे जे बॉम्ब, बॉम्ब म्हणताय ते लवंगी फटाके देखील नाहीत"

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics : विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. विरोधक बॉम्ब म्हणत आहे ते लवंगी फटाकेही नाहीत, आमच्याकडेही बॉम्ब आहेत आम्ही ते योग्य वेळी फोडू असा इशारा देखील फडणवीसांनी दिला आहे. दरम्यान सभागृहात सीमावादावर बोलणाऱ्यांनी अडीच वर्षात काहीच केलं नाही असा टोला हा देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे.

कुठलही प्रकरण काढायचं आणि त्यावर हंगामा करायचा आणि उत्तर घ्यायचं नाही हा अशाप्रकारचा प्रयत्न दिसतो आहे. आतापर्यंततरी हे जे बॉम्ब, बॉम्ब म्हणताय ते लवंगी फटाकेदेखील नाहीत. आमच्याजवळ भरपूर बॉम्ब आहेत, ते कधी काढायचे आम्ही ठरवू पण आता सध्या यांचे लवंगी फटाके काय आहेत, ते आम्ही बघू असं फडणवीस म्हणाले. (Tajya News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमा वादावर (राज्य विधानसभेत) ठराव मांडतील. मला आशा आहे की हा प्रस्ताव बहुमताने मंजूर होईल. मला आश्‍चर्य वाटते की अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, त्यावेळे त्यांनी काहीच केलं नाही. आमचे सरकार आल्यानंतर सीमावाद सुरू झाला नाही. निर्माण झालेला नाही. सीमाप्रश्न आमचं सरकार आल्यावर निर्माण झालेला नाही. सीमाप्रश्न महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किंवा भाषावार प्रांतरचना तयार झाली तेव्हापासून आहे. तेव्हापासून वर्षानुवर्षे ज्यांची सरकारं आहेत, ते आता असं भासवत आहेत जणूकाही हे सरकार आल्यानेच सीमाप्रश्न तयार झाला असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भररस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

Maharashtra Politics: ते पाकिस्तानलाही सोबत घेतील; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

SCROLL FOR NEXT