Devendra Fadnavis Saam
महाराष्ट्र

Politics: राज - उद्धव ठाकरे एकत्र येणार का? प्रश्न विचारताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधी हसले आणि मग..

Devendra Fadnavis: ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. ''ते दोन पक्ष आहेत… भाऊ आहे… त्यांचं त्यांना ठरवायचं आहे..'

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना "जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल, आता थेट बातमीच देऊ" असं सूचक विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या सूचक विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.

राज्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ते दोन पक्ष आहेत… भाऊ आहेत..त्यांचं त्यांना ठरवायचं आहे. ठरलं तरच प्रतिक्रिया देऊ. मी ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ नाही,' असं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं. तसेच दोन भावांमध्ये नेमका किती संवाद आहे, माहिती नाही, मात्र माध्यमांमध्ये जास्त उत्सुकता दिसत असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनसेकडून प्लॅन A आणि B वर काम सुरु

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पुढील रणनिती ठरवली जात आहे. यासाठी शिवसेनासोबत युती करायची की एकला चलो रेच्या ट्रॅकवरच इंजिन पळवायचं, यावर मनसे नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मागचे अनुभव पाहता मनसेकडून प्लॅन ए आणि प्लॅन बीची तयारी सुरू केल्याची माहिती आहे.

मनसेच्या केंद्रीय समितीने मुंबईसंदर्भातील एक सविस्तर अहवाल राज ठाकरेंना सोपवला आहे. यामध्ये ठाकरे गटाशी युती आणि महायुतीची असलेली ताकद या दोन्ही गोष्टींबाबत विश्लेषण करण्यात आल्याची माहिती आहे.

राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर सध्या प्रत्येक जण संभ्रमात आहे. याचदरम्यान राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलेल्या एका विधानाने खळबळ उडवली. घराबाहेर पडताना गाडीची काच खाली करून काही पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मातोश्रीकडे निघालो आहे.” एवढं ऐकून पत्रकारांची धावपळ सुरू झाली. मात्र, त्यांनी स्मितहास्य दिल्यानंतर पत्रकारांना आपली फिरकी घेतली असल्याचं समजलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

SCROLL FOR NEXT