बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर निवेदन दिलंय. या निवेदनात त्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची पाळंमुळं खोदणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच पोलीस एसपींची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली.
बीडच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिलीय.'बीडच्या मस्साजोगमध्ये गंभीर घटना घडली. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र आहे. ते लवकर बदललं पाहिजे. माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलीय. इथपर्यंत हे प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आवाडा एनर्जी कंपनीनं पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केलीय. यातून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार सुरूय. ६ डिसेंबर रोजी दुपारच्या १२ . ३० वाजता मस्साजोग येथे आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले हे आरोपी चालून गेले. सर्वात आधी त्यांनी वॉचमॅन अमरदिप सोनवणेला मारहाण केली. त्यानंतर तेथील सीनिअर मॅनेजर शिवाजीराव थोपटे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही सविस्तर माहिती वॉचमॅननं सरपंच संतोष देशमुख यांना दिली.
त्यानंतर तातडीनं सरपंच आणि काही जण घटनस्थळी पोहोचले. आपल्या माणसांना दुसऱ्या गावातली माणसं मारहाण करीत असल्याचं पाहून त्यांनी हुस्कावून लावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांच्यात मारामारी झाली. ९ डिसेंबरला संतोष देशमुख गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर त्यांना आतेभाऊ भेटले, त्यांना सोबत घेऊन निघाले.
टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची गाडी आणखीन एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले आणि काळ्या रंगाच्या गाडीत घालून त्यांना मारहाण केली. काही दिवसांनी त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं.
या प्रकरणात कुणीही मास्टरमांईड असला तरी त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. या चौकशीसाठी पोलीस महानिरिक्षक पातळीवर एसआयटी स्थापन केली जाणार असून न्यायालयीन चौकशीचीही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तसेच बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांचीही बदली होणार असल्यांचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.