Devendra Fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटले नसून त्यांचावरच हल्ला झालाय; विरार प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis News : विनोद तावडे प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाचा मुद्दा महाविकास आघाडीने लावून धरला आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्यादिवशी पैसे वाटपावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरारमध्ये पैसे वाटपाचे बहुजन विकास आघाडीचे आरोप भाजप नेते विनोद तावडे यांनी फेटाळून लावले आहेत. यावरून महाविकास आघाडीनेही भाजपवर निशाणा साधलाय. आता याच प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आहेत. यावेळी विनोद तावडे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, ' निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो, त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा प्रकार आहे. विनोद तावडे आमचे, राष्ट्रीय महामंत्री आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याजवळ कुठलाही पैसा सापडलेला नाही. कुठली आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही'.

'विरारमध्ये खरंतर उलट त्यांच्यावरच तिथे हल्ला झाला. महाविकास आघाडीची इकोसिस्टम आहे, ते कव्हर करण्यासाठी कव्हर फायर केलेला आहे. विनोद तावडे यांनी कुठलेही पैसे वाटले नाही, मिळाले नाही, असे फडणवीस पुढे म्हणाले.

अनिल देशमुख हल्ला प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले?

अनिल देशमुख यांच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' अनिल देशमुख यांनी सातत्याने या ठिकाणी जसा हिंदी सिनेमात सलीम-जावेदच्या स्टोरी अतिशय प्रसिद्ध होत्या. तशाच सलीम जावेदच्या स्टोरी चालू केल्या आहेत. पहिल्या पुस्तकाची टूम उडवली. आता तसा त्याने सुरू केला आहे. पोलिसांची पत्रकार परिषद बघितली आहे. त्यात सगळं स्पष्ट झालेलं आहे'.

'आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की, दहा किलोचा गोटा पडला. तर कारची काच का तुटली नाही. एकच गोटा आतमध्ये दिसला. मागची काच फोडून हा दगड मारलेला आहे. हा दगड मागून मारलेला आहे, तर मागे लागायला पाहिजे होता, तो समोर कसा लागला. - हे रजनीकांतच्या सिनेमाप्रमाणे गोल फिरून दगड लागला की काय? हा सर्व समोर आलंय. त्याचा सिनेमा समोर आला असून त्यात स्पष्ट होत आहे, असे फडणवीस पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान; EVM मध्ये कैद होणार ४,१३६ उमेदवारांचं भवितव्य

Virar Politics : पैसे वाटल्याच्या आरोपावरून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; बविआ आमदार क्षितिज ठाकूरांविरोधात गुन्हा

Maharashtra Politics : विरारमध्ये राडा, डहाणूत पक्षप्रवेश; मतदानापूर्वी बविआ उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

Maharashtra News Live Updates: बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांविरोधात गुन्हा दाखल

Vinod Tawde: भाजप नेत्यानं टीप दिल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा; विनोद तावडे म्हणाले, कारमध्ये काय चर्चा झाली मलाच माहिती

SCROLL FOR NEXT