Devendra Fadnavis Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: राम राष्ट्राची प्राॅपटी; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे गटावर टीका

Devendra Fadnavis on thackeray Group: ठाकरे गटाच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. राम राष्ट्राची प्रॉपटी आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

सुरज मसुरकर

Devendra Fadnavis on thackeray Group:

राज्यात श्रीरामाच्या मुद्द्यावरून राजकारण तापत आहे. श्रीरामाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने भाजपवर टीका केली होती. श्रीराम वैयक्तिक प्रॉपर्टी आहे का, असा सवाल ठाकरे गटाने भाजपला उपस्थित केला होता. ठाकरे गटाच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. श्रीराम राष्ट्राची प्रॉपटी आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीसांनी रायगडमधील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाच्या श्रीरामवरील वक्तव्याचा समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'येत्या काळात मोठ्या प्रमाणात जी इनवेस्टमेंड रायगडमध्ये येणार आहे. या रायगडचं चित्र मोठ्या प्रमाणात आपण बदलत आहे. नवीन सरकार आल्यानंतर आम्ही सामान्य माणसाचा विचार केला. आम्ही अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना थेट मदत केली आहे'.

'आम्ही शेतकऱ्यांना स्थैर्य देण्याचा प्रयत्न आपण केला. मोठ्या प्रमाणात आज माता-भगिनी उपस्थित आहेत. ६०% महिला या ठिकाणी आहेत. मोदीजी म्हणतात की,महिलाच देशाला पुढे नेणार. यामुळे येत्या काळात महिलांसाठी वेगवेगळ्या योजना येणार आहेत. महिला सक्षम होणार आहेत. येत्या काळात महाराष्ट्राला सक्षम करणार आहेत, असेही ते म्हणाले.

'एसटी बसमध्ये ५०% सवलत दिली. महिलांना विनंती आहे की, जिल्हाच्या ठिकाणी जायचं असेल, तर घरी सांगा की, तुम्ही थांबा आम्ही जातो. आम्ही गेलो तर पैसे वाचतील. मला माहीत आहे की, महिला गेल्या तर चांगलंच काम करतील आणि पैसेही वाचवतील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्रीराम लोकार्पण सोहळ्यावरून फडणवीसांची ठाकरे गटाला प्रत्युत्तर

'२२ जानेवारीला नवीन चाप्टर सुरु होत आहे. आमची अस्मिता, आमचा अभिमान त्याच ठिकाणी विराजमान होणार आहेत.

हा देशाचा अस्मितेचा कार्यक्रम आहे. पण काही लोक त्यात विवाद तयार करत आहेत. मला आश्चर्य वाटत आहे, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाला दिलं.

'काही लोक म्हणतात की राम तुमची प्रायव्हेट प्रॉपटी आहे का? राम ही राष्ट्राची प्रॉपटी आहे. इकडे बसणाऱ्या प्रत्येकाची आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT