Devendra Fadnavis   x platform
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : लबाडाचं आवतन खाल्ल्याशिवाय कळत नाही; सोयाबीन खरेदीवरून देवेंद्र फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

Devendra Fadnavis on Maha vikas aghadi : देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीवरून महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी फडणवीसांनी मतदारांंना मोठं आश्वासन दिलं.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला होता. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने सोयाबीन उत्पादकांना एका क्विंटलमागे ७ हजारांचा भाव देऊ, असे आश्वासन दिले आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

कालच केंद्र सरकारने आदेश काढलाय की, १२ टक्क्याने ऐवजी १५ टक्क्यांपर्यंतचं मॉइश्चर सोयाबीन पिकासाठी ग्राह्य केला आहे.

आता सोयाबीनची खरेदी सरकार सहा हजार रुपये हमीभावाने करणार आहे.

आम्ही एकाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा नुकसान होऊ देणार नाही. पण लगेच लबाडाचं आवताण आलं.

कर्नाटकात ३८०० रुपये भाव देतात. ते इथे सांगताहेत की, ७ हजार रुपये भाव देऊ. म्हणून लबाडाचं आवताण खाल्ल्याशिवाय कळत नाही.

14000 मॅगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प काम सुरू केलं. 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यावर मुबलक प्रमाणात वीज मिळेल.

आमचं सरकार पुन्हा आल्यास आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत.

प्रत्येक समाजाकरिता वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं.

आम्हाला ५० लाख लखपती दीदी करायच्या आहेत. महिलांसाठी एसटीमध्ये 50% सूट दिली.

जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली. तेव्हा शरद पवार काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस सर्वांनी टीका करायला सुरुवात केली.

अडीच कोटी महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा केले. त्यानंतर यांची थोबाड बारीक झाली.

आम्ही महिलांसाठी योजना बनवली यांना पाहावली गेली नसल्याने शरद पवार गट, काँग्रेस, उबाठावाले कोर्टात गेले.

मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, तुम्ही मला राहुल आहेरांच्या रूपाने आमदार द्या पहिल्याच मीटिंगमध्ये कॅबिनेट देतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT