Gondia Politics: देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी फोन न उचल्याने माजी आमदारानं सोडली भाजपची साथ Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Politics: देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी फोन न उचल्याने माजी आमदारानं सोडली भाजपची साथ

Ramesh Kuthe : गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकला होता. दरम्यान नाना पटोले यांनी त्यांची भेट घेतलीय. कुथे यांनी आपण भाजप का सोडली याचं कारण दिलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुभम देशमुख, साम प्रतिनिधी

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार यांनी आपण भाजपची साथ का सोडली याचा खुलासा केलाय. नाना पटोलेंनी त्यांची भेट त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करुन घेणार आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलाला तिकीट दिलेलं आश्वासन पूर्ण न केलं नाही. तसेच त्यांनी फोन सुद्धा उचलला नाही यामुळे आपण भाजपची साथ सोडल्याचं कुथे म्हणालेत.

दरम्यान माजी आमदार तसेच विद्यमान भाजप नेते रमेश कुथे यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी १५ जून च्या मध्यरात्री कुथे कुटुंबियांची घरी जात भेट घेतली होती. या भेटीने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. कुथे भाजप नेत्यांच्या वागणुकीवरुन नाराज होते, त्याचदम्यान नाना पटोले यांनी त्यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदिया विधानसभेत ओबीसी चेहऱ्याची मागणी होते. त्याचवेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी एका लग्न समारंभात कुथे कुटुंबियांची भेट घेतली.

या भेटीने गोंदियाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजप सोडल्याने ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आपण भाजप का सोडली यांचं कारण सांगितलंय. भाजपची साथ सोडण्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कारणीभूत असल्याचं कुथे म्हणालेत.

लोकसभा विधानसभा तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत आश्वासन देऊनही मुलाला तिकीट तर दिलं नाही. याशिवाय त्यांनी माझा फोनदेखील न उचलला नाही, यामुळे आपण भाजपची साथ सोडली असा गौप्यस्फोट माजी आमदार रमेश कुथे यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर रमेश कुथे यांनी भाजप सोडली. त्यामुळे नाना पटोले यांनी माजी आमदार रमेश कुथे यानां दिलेला शब्द नाना पटोले पाळतील काय हे पाहण्यासारखं असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

SCROLL FOR NEXT