Jayant Patil Comment On Shah And Fadnavis  business today
महाराष्ट्र

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस-अमित शहा यांच्यात अंतर...; असं का म्हणाले जयंत पाटील?

Jayant Patil Comment On Shah And Fadnavis : शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मोठं विधान केलंय. जयंत पाटील यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ माजलीय.

Bharat Jadhav

भाजप नेते अमित शहा कालपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली. निवडणुकासाठी भाजपने कंबर कसलीय. दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत, मात्र त्या लवकरच जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने भाजपच्या हालचालींनी वेग धरलाय. भाजप नेत्याच्या धावपळ चालू असतांनाच जयंत पाटील यांनी भाजपमधील अंतर्गत कलहावर भाष्य केलं.

भाजपमध्ये अंतर्गत असल्याचे सुतोवाच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केले आहे. जयंत पाटील यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मोठं विधान केलंय. शहा आणि फडणवीस यांच्यात अंतर असल्याचं म्हटलंय.जयंत पाटील पुण्यात श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने महाराष्ट्र व्हिजन-२०५० या विषयावर बोलत होते. परंतु जयंत पाटील यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ माजलीय. अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नसल्याचंही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी यावेळी म्हटलं.

राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. शिवसेनेत बंड घडवून आणणे आणि शिंदेंना आपल्यासोबत घेणं. एकनाथ शिंदे भाजपसोबत आल्यानंतर त्यांना अमित शहा यांच्या सांगण्यावरुन शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर अमित शहा आणि फडणवीस यांच्यात आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. फडणवीस आणि शिंदेच्या सरकारला काही काळ झाला असताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना सत्तेत सामील करून घेतलं.

मात्र या युतीचा लोकसभा निवडणुकीत भाजपला हवा तसा फायदा झाला नाही. अजित पवार यांना सोबत घेतल्यानेच भाजपला फटका बसल्याची टीका आरएसएसने केली होती. त्यानंतर पुन्हा अमित शहा आणि फडणवीस यांच्यातील मतभेदाची चर्चा दबक्या आवाजात होत होती.

आता पुण्यातील कार्यक्रमात बोलतांना जयंत पाटील यांनी पुन्हा अजित पवार यांचे सत्तेत जाण्याविषयी भाष्य केलंय. यावर बोलतांना पाटील म्हणाले, अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नाहीये. त्या दोघांमधे अंतर आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मनासारखं महाराष्ट्रात काम करता येत नाही. त्यामुळे त्यांची पंचायत होत आहे. तर बाकी दोघे सत्तेसाठीच गेले आहेत. मात्र जनतेने हे त्रिकुट अमान्य केलेलं आहे.

भाजपची लोकप्रियता कमी झालेली आहे. त्यामुळे ते अजित पवारांना वेगळे लढावे, मग एकत्र येऊ असे सांगतील, अशी शक्यताही जयंत पाटील त्यांनी वर्तविली. अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासहार्यता कमी झाली आहे. महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे.

तर आमच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुतारी हातात घेण्यासाठी लोकांच्या भावना आहेत. मुख्यमंत्री कोण होईल या पेक्षा आता असलेले सरकार घालविणे जास्त महत्वाचे आहे. भारतीय जनता पार्टी सुतकात आहे. मूळ भाजपवाले बाजुला राहिले आणि बाकीचे लोक पक्ष चालवत आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT