महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी महायुतीच्या नेत्यांना केल्या. मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं.
अमित शहा यांनी रविवारी रात्री भाजपच्या विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या ज्या चुकांमुळे अपयश आले. त्या चुका टाळण्याच्या सूचना भाजप नेते अमित शहा यांनी केल्या, असे सुत्रांनी सांगितले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाणही उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक होती.भाजपने नुकताच विधानसभा निवडणुकीसाठी मेगाप्लान तयार केलेला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक होती.भाजपाने नुकताच विधानसभा निवडणुकीसाठी मेगाप्लान तयार केलेला आहे. दरम्यान महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी विधानसभेत भाजप तब्बल १६० जागांवर निवडणूक लढवणार आहे. यापैकी १२५ जागांवर त्यांनी तयारी सुरू केलीय. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी ६४ जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मागील निवडणुकीत भाजपने १५० हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी १०५ जागांवर त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळेच सध्या भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेवरुन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांनी लालबागच्या राजाचा अपमान केल्याचे म्हणत माफीची मागणी केली होती. भाजपच्या या आरोपानंतर आता संजय राऊत यांनीही सडेतोड उत्तर दिले. छत्रपती शिवरायांचा अपमान होत असताना फडणवीस यांनी माफी मागितली का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.