Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : अजित पवारांनी मागितलं तरी ते खातं देणार नाही! देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis : नमो रोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर दिसले. मेळाव्याला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कामांचे कौतुक केलं.

Bharat Jadhav

Devendra Fadnavis In Namo Rojagar Melava Baramati :

बारामतीत आज नमो रोजगार मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केलं. मेळाव्याआधी काही शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आले. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. त्याचवेळी फडणवीसांना मंत्री पदावरून त्यांना चिमटा देखील काढला. इमारतीचं काम चांगले केले आहे, पण मंत्रीपद देणार नसल्याची मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी केली.(Latest News)

बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. तुम्ही काम करा पण गृहखातं मिळणार नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. बारामतीत रोजगार मेळावा आयोजित केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केलं. रोजगार मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळून दिली. अधिसुचित केलेल्या सुचनेपेक्षा आलेले अर्ज कमी आहेत. अर्ज ३६ हजार आली आहेत, तर पदे ५५ हजार आहेत. यामुळे उमेदवारांना नोकरी मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.

मेळाव्याआधी मुख्यमंत्री (Chief Minister) आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन झालं. या नमो रोजगार मेळाव्यात बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. रोजगार (Employment)मेळाव्याला प्रचंड प्रसिद्धी मिळून दिल्याविषयीही अजित पवार यांचे कौतुक केले. बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं. इमारतीचं काम पाहून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. बारातमतीमधील बस स्टॅण्ड एसी पाहून ते बस स्टॅण्ड असल्याचं वाटत नाही तर ते विमानतळ वाटतं.

येथील पोलीस आयुक्तालय, पोलीस वसाहतीचे काम उत्तम झालं आहे. हे कार्यालये एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस वाटतात. त्यामुळे अजित पवार तुम्ही स्वतः लक्ष घालून राज्यातील पोलीस वसाहतीच्या इमारतीच्या कामे करून घ्या. त्या कामाचं तुम्हालाच पीएमसी म्हणून नियुक्त करावं असं वाटतं. त्यावर तुम्ही थेट गृहखातं मागू शकतात. पण तसे होणार नाही, खाते माझ्याकडेच ठेवणार," अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीसांनी केली. राजकारणी लोक कंत्राटी रोजगार असतात. आम्हाला पाच वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळते. चांगलं काम केलं तर पुन्हा संधी मिळत असते. नाहीतर घरी बसावे लागतं, असंही फडणवीस म्हणाले.

अधिसुचित केलेल्या सुचनेपेक्षा आलेले अर्ज कमी आहेत. अर्ज ३६ हजार आली आहेत, तर पदे ५५ हजार आहेत. यामुळे उमेदवारांना नोकरी मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. राज्यातील तरुणांना रोजगार हवा या मेळाव्यातून रोजगार मागणारे आणि देणारे एकत्र आलेत. अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनीही अजित पवार यांचे त्यांच्या कामाविषयी कौतुक केले. बारामतीमधील बसस्थानकात सर्व सुखसोयी उपलब्ध असणार आहे. याप्रकारचे बसस्थानके राज्यभरात केली जात आहेत. बारामतीत झालेल्या नवीन इमारती या दर्जेदार आहेत. पोलिसांच्या नवीन इमारती दर्जेदार आहेत. पोलीस कधी ही बघितलं तर उन, पाऊसमध्ये बाहेर असतात. आजच्या मंचावर पवारसाहेब पण आहेत आणि अजित पवारसुद्धा आहेत. विकासकामात आम्ही राजकारण अणू इच्छित नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT