Baramati News: बारामतीतील कार्यक्रमात शरद पवार-अजितदादांचं जोरदार भाषण; कोण काय बोललं? सविस्तर वाचा...

Ajit Pawar-Sharad Pawar Speech: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. बारामती येथील महारोजगार मेळाव्यात दोन्ही नेत्यांनी उपस्थितांना संबोधित करत जोरदार भाषणेही केली.
Sharad Pawar Ajit Pawar Baramati
Sharad Pawar Ajit Pawar BaramatiSaam TV
Published On

Sharad Pawar Ajit Pawar Baramati News

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच एकाच मंचावर आले. बारामती येथील महारोजगार मेळाव्याला दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. इतकंच नाही, तर शरद पवार आणि अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करत जोरदार भाषणेही केली. मात्र, यावेळी दोघांनीही फक्त बारामतीच्या विकासकामांवरच भाष्य केलं. त्याचबरोबर एकमेकांवर टीका करणं टाळलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar Ajit Pawar Baramati
Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर पडला जीवघेणा खड्डा; पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालक धास्तावले

शरद पवार काय म्हणाले?

नव्या पिढीच्या हाताला काम देण्यासाठी राज्यात रोजगार निर्मीती करणे गरजेचे आहे. सरकारने यावर लक्ष घातल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो, असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच महायुती सरकारमधील मंत्र्यांचे आभार मानले.  (Latest Marathi News)

बारामतीतील मुलांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार जे-जे पाऊल उचलेल त्यासाठी आमची मदत राहील, असंही शरद पवार यांनी बोलताना स्पष्ट केले. शरद पवार (Sharad Pawar) भाषण यांनी सरकारचे आभार मानत भाषण संपवल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट केला.

अजित पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर अजित पवार यांनी देखील भाषण केलं. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत आले. मी त्यांचे स्वागत करतो, असं म्हणत अजित पवार यांनी बारामतीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत केलं.

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar म्हणाले, "दोन दिवस नमो महारोजगार मेळावा सुरू राहणार असून या मेळाव्यातून हजारो-तरुण तरुणींना रोजगार मिळेल. नव्या पिढीला काम मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. रोजगार उपलब्ध आहेत, फक्त संधीचं सोनं करा", असं आवाहन अजित पवारांनी केलं.

यावेळी बारामतीत सुरू असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली. बारामतीत सध्या विविध विकासकामे सुरू असून राज्यातील नंबर एक स्थानक उभारण्यात आलं आहे. काम सुरू असताना ४० वेळा मी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या, असं अजित पवार म्हणाले.

मला काम करायचं, तर नंबर एकच करतो, नाहीतर भानगडीत पडत नाही, असंही अजित पवार म्हणाले. काम सुरू असताना बारामतीकरांनी सहकार्य केलं त्यामुळे त्यांचे देखील आभार... महाराष्ट्रात विकासाच्याबाबतीत बारामतीला नंबर १ चा तालुका करून दाखवणार, असं आश्वासन देखील अजितदादांनी बारामतीकरांना दिलं.

Sharad Pawar Ajit Pawar Baramati
Weather Update: महाराष्ट्रासह १३ राज्यांना बसणार गारपीटीचा तडाखा; कुठे कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com